Ashok Tawre
हि कसली लोकशाही - कवी लेखक अशोक टाव्हरे यांचा सवाल मुंबई : प्रतिनिधी आदिवासी समाजातील सरपंच असलेल्या महिलेला जाहीर कार्यक्रमात स्टेजवर संधी दिली नाही. मात्र मारहाण आणि विनयभंग असे गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला खुलेआम व्यासपीठावर प्रवेश देण्यात येतो. कसली ही लोकशाही ? असा सवाल समाजसेवक कवी लेखक अशोक टाव्हरे यांनी गुरुवारी मुंबई मराठी पत्रकार परिषदेत केला आहे. सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी गेल्या आठवड्यात कनेरसर गावी भेट दिली होती. यावेळी झालेल्या कार्यक्रमात मारहाण आणि विनयभंग असे गुन्हे दाखल असलेल्या जवाहर विठ्ठल दौंडकर खुलेआम व्यासपीठावर कसे काय फिरत होते ? असा सवाल अशोक टाव्हरे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. ज्याच्या नावावर खटले दाखल आहेत, त्यांना वगळून इतरांना कार्यक्रमाचे पास देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. परंतु, गुन्हे दाखल असलेल्या दौंडकर यांना प्रशासनाकडून पास देण्यात आले. सरन्यायाधीश डॉ. चंद्रचूड यांनी कनेरसर येथे येण्याअगोदर न्यायदेवतेची पट्टी काढून हातात संविधान ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यांच्याच कार्यक्रमात गुन्हेगार ख...