बंजारा नेते
बंजारा समाजाला महायुती आणि महाविकास आघाडीकडून पुरेसे प्रतिनिधित्व मिळायला हवं!
महाराष्ट्रात बंजारा समाजाची लोकसंख्या गाव-तांडयात दोन ते अडीच कोटी आहे.सव्वा कोटी मतदार आहे. मात्र अजूनही बंजारा समाजाला प्रस्थापित उमेदवारांशिवाय उमेदवारी मिळत नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे.राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत बंजारा समाजाला महायुती आणि महाविकास आघाडीकडून पुरेसे प्रतिनिधित्व मिळायला हवं होतं.मात्र ते मिळू शकले नाही.अशी खंत बंजारा बॉलीवुड चित्रपट 'संत सेवालाल' व 'नवलेरी वेतडू' बंजारा नाटकाची निर्मिती व दिग्दर्शन करणारे समाजसेवक चंद्रकांत काळुराम पवार यांनी पत्रकार संघात व्यक्त केली.
चंद्रकांत पवार हे गेल्या अनेक वर्षापासून बंजारा समाजासाठी काम करत आहेत.
बंजारा समाजाच्या बोलीभाषेला राज्यभाषेचा दर्जा मिळावा हाच त्यांचा मुळ उद्देश आहे. यामुळे बंजारा समाज हा पुढे येईल, बंजारा समाजाचे प्रश्न सुटतील, समाजाला न्याय मिळेल. असे वाटत होते मात्र अजून पर्यत न्याय मिळाला नाही.
२० तारखेला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत बंजारा समाजाने पक्षपात न करता बंजारा समाजाच्या उमेदवारांला स्वयंस्फुर्तीने सहकार्य करावे, निवडणुकीमध्ये प्रत्यक्षपणे गावतांडयात जाऊन बंजारा उमेदवारांचा प्रचार व प्रसार करावा, वेळ पडेल तर पक्ष न जुमानता बंजारा उमेदवरांना सर्व स्तरावरून सहकार्य करावे व लोकशाहीला भरभक्कम करण्यासाठी सर्वांनी मतदानाच्या अधिकाराचा वापर करावा असे आवाहन चंद्रकांत पवार यांनी सर्व बंजारा समाजाला केले आहे.
Comments
Post a Comment