सांगोला विधानसभा
सांगोलाचे नेते राजाराम कालेबाग यांचा उमेदवारी अर्ज दाखल मुंबई : प्रतिनिधी सांगोल्याची भावी आमदार व बहुजन नेते राजाराम काळेबाग यांनी 25 ऑक्टोंबर 2024 रोजी आपला अपक्ष उमेदवार अर्ज प्रांत अधिकारी तहसील कार्यालय सांगोला यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी सांगोल्याचे किंगमेकर म्हणून भूमिका बजावणारे भावी आमदार व बहुजन नेते राजाराम काळेबाग यांनी कार्यकर्त्यांना व मतदारांना संबोधित करताना विजयाचा निर्धार व्यक्त केला. ग्रामदेवतेचे व हनुमानाचे दर्शन घेऊन त्यांनी अर्ज भरला. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी सायकलवर स्वार होत प्रांत कार्यालय गाठले होते. त्यामुळे सर्वांच्याच नजरा त्यांच्याकडे रोखून होत्या. अर्ज भरण्यासाठी सायकलवरून आलेल्या नेत्याला पाहून सर्वच अचंबित झाले होते. सर्वसामान्यांच्या मनातला आपला नेता म्हणून लोक त्यांना भेटत होते.
Comments
Post a Comment