पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने डॉ. आंबेडकर महाविद्यालयांमध्ये 68 वा धम्मचक्र परिवर्तन दिन संपन्न

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने डॉ.आंबेडकर महाविद्यालया मध्ये ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन‌ संपन्न ‌

मुंबई  : प्रतिनिधी                                             पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने वडाळा येथील डॉ.आंबेडकर महाविद्यालया मध्ये 
६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन‌ साजरा करण्यात आला.पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.आनंदराज यशवंतराव आंबेडकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, त्यांनी सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या  शुभेच्छा दिल्या आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धम्म का‌ स्विकारला, हे‌ सांगुन धम्मचक्र दिनाचे महत्व विशद केले.तर‌ प्रमुख पाहुणे म्हणून मा.काकासाहेब खंबाळकर उपस्थित होते धम्मचक्र प्रवर्तन दिना विषयीची आपल्या बाल पणाची आठवण त्यांनी सांगीतली.व डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा बौध्द धम्म स्विकारण्या मागे कीती श्रेष्ठ उदेश होता ते सांगीतले.
महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.यशोधरा वराळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व 
 विजयादशमीचे महत्व सांगितले.  तर विधी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.डि.ए.गवई यांनी सुत्रसंचलन केले. या प्रसंगी डॉ.रमेश घेगडमल, प्रा.मिलींद तलवार, प्रा.अरुण‌ सोनकांबळे प्रा.एम.एस.गायकवाड  यांची भाषणे झाली तर प्रा. डि.एन.बनसोडे ऊप-प्राचार्य यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिध्दार्थ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.अशोक सुनतकरी, सिध्दार्थ विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या संध्या ढोके, त्याच प्रमाणे मोठ्या प्रमाणात प्राध्यापक वर्ग ‌व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

डॉ.संजय हिराजी खैरे 
प्रसिद्धी प्रमुख.

Comments

Popular posts from this blog

Transport News

मुंबईच्या कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरूच

Mr. Vasudev Gaiyonde press कॉन्फरन्स