दिपकभाऊ निकाळजे
राज्यात दीपकभाऊ निकाळजे 100 जागा लढविणार मुंबई : प्रतिनिधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष तर्फे राज्यभरात 100 जागा लढवणार असल्याची माहिती बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांनी दिली. लोकसभेमध्ये संविधान वाचवण्यासाठी संविधान विरोधी लोकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. विधानसभेमध्ये रिपब्लिकन जनतेला सत्तेमध्ये सन्मानपूर्वक संधी द्यावी यासाठी पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीकडे इच्छा व्यक्त केली होती. महाविकास आघाडीने आतापर्यंत काही विचार केला नाही आम्हाला आशा आहे सन्मानपूर्वक विचार करतील कोणत्याही परिस्थितीत संविधान विरोधी व जातीवादी पक्षासोबत आम्ही जाणार नाही आम्ही आमच्या पक्षाची 100 उमेदवारांची यादी आज घोषित करत आहोत. लवकरच दुसरी यादी ही घोषित करू असे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, महाराष्ट्र सचिव अशोक ससाने, महाराष्ट्र संघटक कैलास जोगदंड, महाराष्ट्र सचिव रमेश भोईर आणि कार्यालयीन प्रमुख तानाजी मिसळे तसेच नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेंद्र गायकवाड, ठाणे शहराध्यक्ष दयानंद उलमी , मुंबई संघटक नितीन जाधव, कल्याण डोंबिवली अध्यक्ष किसन वक्ते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment