वरळीच्या पोतदार रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभाग सुरू करण्याचा राज्य शासनाचा निर्णय

वरळीच्या पोदार रुग्णालयामध्ये ३० खाटांचा अतिदक्षता विभाग सुरु करण्याचा राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय !

मुंबई  : प्रतिनिधी                                                मुंबई महानगर परिसर महाविद्यालय व गो.ते. रुग्णालय, मुंबई या संस्थेशी संलग्नित ३० रुग्णखाटांचा अतिदक्षता विभाग वरळीतील म.आ. पोदार रुग्णालय येथे वर्ष-दीड वर्षांच्या कालावधीत सुरु करण्यात येणार असून, त्यानुषंगाने आवश्यक कर्मचाऱ्यांची पदनिर्मिती आणि यंत्रसामुग्री खरेदी प्रक्रिया सुरु केल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने आज राज्य मानवी हक्क आयोगाकडे सादर केले. सदर अत्यावश्यक वैद्यकीय सेवेचा लाभ वरळी, मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील जनतेला होणार आहे.

सद्यःस्थितीत वरळीकरांना आरोग्य सुविधांसाठी झगडावे लागत असून, येथील अनेक अत्यवस्थ रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागत आहे. जवळपास दीड लाख लोकसंख्या असलेल्या वरळी विभागातील अत्यवस्थ रुग्णांवर वेळीच उपचार होऊन त्यांचे प्राण वाचविण्यासाठी, पोदार रुग्णालयात अत्यावश्यक व अद्ययावत वैद्यकीय (आय.सी.यु.) सुविधा उपलब्ध व्हाव्यात, याकरीता वरळी बी.डी.डी.चाळ क्र. १ येथील शांती वैभव बुद्ध विहार, नवतरुण क्रिडा मंडळ, माता रमाई प्रेरणा महिला मंडळ यांच्या वतीने गेल्या ५ वर्षांपासून मागणी केली जात होती. यासाठी माहितीच्या अधिकारांतर्गत आवश्यक माहिती व आकडेवारी प्राप्त करुन, सदर संस्थेच्या वतीने राज्य मानवी हक्क आयोगाकडे दाद मागण्यात आली होती.

वरळीकरांना तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी वरळीच्या पोदार रुग्णालयात जावे लागते.

तथापि, पोदार रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय उपचार नसल्यामुळे, रुग्णांना केईएम (अंतर ४.२

कि.मी.), नायर (अंतर ५.२ कि.मी.) किंवा जे. जे. रुग्णालय (अंतर ६.६ कि.मी.) हलविताना

तेथील वाहतूक कोंडीमुळे, रुग्णालयात पोहचेपर्यंत वाटेतच शेकडो रुग्णांचे मृत्यू झाल्याची अधिकृत

आकडेवारी संस्थेने राज्य मानवी हक्क आयोगाच्या निदर्शनास आणली.

वरळीतील नागरिकांच्या जीवाची होत असलेली हेळसांड थांबविण्यासाठी, पोदार रुग्णालयात जीवनरक्षक प्रणालीची सुविधा अत्याधुनिक उपकरणांसह उपलब्ध व्हावी, यासाठी सदर संस्थेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून लोकशाही मार्गाने राज्य शासन-प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यांना निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला. यासंदर्भात वरळी विभागात जनजागृती मार्च, पोदार रुग्णालयाच्या आवारात निदर्शने, सह्यांची मोहिम तसेच महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनप्रसंगी वरळी ते विधानभवन अशी मूक पदयात्रा काढून शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला होता.

Comments

Popular posts from this blog

Transport News

मुंबईच्या कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरूच

Mr. Vasudev Gaiyonde press कॉन्फरन्स