RPI news
महायुतीतून बाहेर पडण्याचा रिपाई कार्यकर्त्यांचा इशारा मुंबई : प्रतिनिधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला भाजपा ने उमेदवारी न दिल्यामुळे नाराज झालेल्या रिपाई कार्यकर्त्यांनी गुरुवारी मुंबई प्रेस क्लब बाहेर जोरदार निषेध आंदोलन करीत रिपाईने महायुतीतून बाहेर पडावे असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये मित्रपक्षाबरोबर आपल्या पक्षाच्या उमेदवारी संदर्भात सन्मानपूर्वक वाटाघाटी पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे मित्रपक्षाने अजूनही रिपाई पक्षाला सन्मानपूर्वक जागा मुंबई व महाराष्ट्रात सोडलेल्या नाहीत, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संतोष निर्माण झालेला आहे महायुतीच्या सन्मानपूर्वक वाटाघाटी सुरू असताना पक्ष नेतृत्वाला विश्वासात न घेता महायुतीचे निर्णय होत असताना कार्यकर्त्यांना निवडणुकीत विशेष संधी मिळत नाही. त्यामुळे महायुतीतून आठवले साहेबांनी बाहेर पडावे असा इशारा यावेळी आंदोलक कार्यकर्त्यांनी दिला. या निषेध आंदोलनामध्ये मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, मुंबई प्रदेश सरचिटणीस विवेक गोविंदराव पवार, युवा नेते पप्पू कागदे, सचिनभाऊ मोहिते तसेच सो. ना. कांबळे आणि शिरीष चिखळकर, विशाल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. रामदास आठवले साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है, रिपाईला जागा मिळाल्याच पाहिजेत मिळाल्याच पाहिजे. अरे कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, मागणी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, महायुती आपल्याला जागा देत नसेल तर बाहेर पडा बाहेर पडा महायुतीतून बाहेर पडा अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जात होत्या.
Comments
Post a Comment