कोर्टाच्या आदेशानंतरही एमपीएससी कृषी सेवा 2021 च्या नियुक्ती बद्दल शासनाकडून दीड वर्ष होतेय टाळाटाळ
कोर्टाच्या आदेशानंतरही MPSC कृषी सेवा 2021 च्या नियुक्तीबद्दल शासनाकडून होतेय दीड वर्षांपासून टाळाटाळ
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कृषी सेवा 2021 भरती प्रक्रियेतील त्या 203 यशस्वी उमेदवारांना अद्याप नियुक्त्या न दिल्याने राज्यातील प्रशासनावर गंभीर आरोप होत आहेत. न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानंतरही या नियुक्त्यांमध्ये होत असलेला विलंब उमेदवारांसाठी चिंता निर्माण करणारा ठरला आहे.
न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, कृषी सेवा भरती परीक्षेतील उमेदवारांच्या नियुक्त्या तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, संबंधित शासकीय विभागांकडून अद्याप या नियुक्त्या न करण्यात आल्याने उमेदवारांमध्ये असंतोष आहे. विशेषतः या प्रक्रियेच्या विलंबामुळे उमेदवारांचे शैक्षणिक आणि व्यावसायिक आयुष्य धोक्यात आले आहे.
शासनाच्या उदासीनतेबद्दल उमेदवारांनी आपली नाराजी व्यक्त करत न्यायालयात केलेल्या लढ्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. परंतु न्यायालयीन आदेशांचे पालन न केल्यामुळे प्रशासनावर टीका होऊ लागली आहे.
शासनाकडून दीड वर्षांपासून 203 कृषी अधिकाऱ्यांना कृषी विभागात नियुक्त करून घेण्यास जाणूनबुजून टाळाटाळ होत असल्याची भावना उमेदवारांमध्ये झाल्याने उमेदवार 4 ऑक्टोबर पासून आझाद मैदान, मुंबई येथे नियुक्तीमिळेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करत आहे आणि ते नियुक्ती मिळेपर्यंत चालूच राहणार आहे अशी उमेदवारांची भावना आहे .या प्रकरणी शासनाने तातडीने निर्णय घेऊन उमेदवारांना नियुक्ती देऊन त्यांना तात्काळ न्याय द्यावा.
Comments
Post a Comment