शिवसेना वाघ
वरळीमध्ये छोटू देसाई यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा मुंबई : प्रतिनिधी वरळी येथील ज्येष्ठ शिवसैनिक व उद्धव ठाकरे गटाचे नेते परशुराम उर्फ छोटू देसाई यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शिवसेनेचे माजी मंत्री व नेते सचिन भाऊ अहिर तसेच मा. आमदार सुनील शिंदे यांनी उपस्थिती दर्शवली होती, याप्रसंगी स्वतः सचिन भाऊ यांनी वाढदिवसाचे गाणे बोलून छोटू देसाई यांना शुभेच्छा दिल्या. मोठ्या संख्येने आजी-माजी शिवसैनिकांनी व युवा शिव सैनिकांनी याप्रसंगी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी पत्रकारांशी बोलताना छोटू देसाई म्हणाले की, आज माझा वाढदिवस आहे. आपल्या सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी आभारी आहे. परंतु सध्या विधानसभेची निवडणूक सुरू आहे आणि वरळी विधानसभेमधून शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे उभे राहिले आहेत. त्यांच्या पाठीशी आपण सर्वांनी उभे राहून त्यांना आशीर्वाद द्यावेत असे छोटू देसाई यांनी सांगितले.
Comments
Post a Comment