थॉट्स ऑफ आंबेडकर पुस्तकाचे प्रकाशन


थॉट्स ऑफ आंबेडकर या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न* 

"थाॅट्स ऑफ आंबेडकर" हे पुस्तक आंबेडकरी चळवळीला 
दिशा देणारे ठरेल..
  - -जेष्ठ पॅथर साहित्यिक  अर्जून डांगळे.

प्रतिनिधी: मुंबई.
 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण या महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या ग्रंथ मालिकेतील खंड क्रमांक १८  भाग १ या खंडाचे बारकाईने परिशिलन करुन विविध विचारांचे संकलन केलेल्या नामदेव साबळे यांच्या थॉट्स ऑफ आंबेडकर या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा प्रख्यात साहित्यीक आणि ज्येष्ठ नेते अर्जून डांगळे यांच्या हस्ते  मुंबई पत्रकार कल्बच्या सभागृहात शुक्रवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२४ रोजी , सायंकाळी सात वाजता संपन्न झाला  . सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दलित पँथरचे अध्यक्ष आणि नेते सुरशदादा केदारे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून दैनिक सार्वभौम राष्ट्राचे संपादक प्रा.प्रेमरत्न चौकेकर हे उपस्थित होते. सदर 
कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक दिवाकर शेजवळ, वर्कशॉप या मॅगजिनचे संपादक सुनिल कदम आणि साहित्यिक विचारवंत राजू रोटे यांनी या मार्गदर्शन केले. जेष्ठ पॅथर नेते कवी व साहित्यिक अर्जून डांगळे पुस्तक प्रकाशन सोहळ्यात म्हणाले की, गेल्या वर्षी नामदेव साबळे लिखित कविता संग्रह "सूर्यबिंब" या पुस्तकाचे माझ्याच हस्ते प्रकाशन झाले त्याचा आज वाढदिवस व आज नव्याने लिहिलेले "थाॅट्स ऑफ आंबेडकर" या पुस्तक प्रकाशन 
सोहळा माझ्याच हस्ते होत आहे जनूकाय दुसऱ्या पुस्तक अपत्याचे बारसे केल्याचा आनंद होतोय! पुढे तिसरे पुस्तक अपत्य निर्माण करावे! त्याला कांही तिसरे पुस्तक अपत्याला निर्बंध नाही रहाणार! नामदेव साबळे यांना उद्देशून मिस्किलपणे म्हणाले, 
तसेच हे  नवीन पुस्तक "थॉट्स ऑफ आंबेडकर पुस्तक" मुनुवादाला गाडून आंबेडकर वादाला गती व दिशा देणारे नवीन तरुणाई पीडीला घडवणारे उर्जा व प्रेरणा देणारे ठरेल! असे गौरवोद्गार काढून 
सदर पुस्तक लेखक नामदेव साबळे व त्यांच्या सुविद्यपत्नी सौ.जयश्रीताई नामदेव साबळे  व त्यांच्या इतर सहकार्यातून अतिशय छान सुंदर  क्रांतिकारक पुस्तक आंबेडकरी चळवळी करीता उपयुक्त निर्मीती केल्याबद्दल कौतुक करुन अभिनंदन करून लेखकास व उपस्थितांना डांगळे यांनी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज चाळके यांनी तर प्रास्ताविक नामदेव साबळे यांनी केले.सदर कार्यक्रमास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोब्रागडे गटाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निर्भवणे साहेब, समाज भूषण पुरस्कार प्राप्त सोना कांबळे, समाज भूषण पुरस्कार प्राप्त दिगंबर वानखेडे , गुन्हे नोंद या मासिकाचे संपादक संतोष भालेराव, विद्रोही कवी बबन सरवदे, साहित्यिक अशोक रणदिवे, समाज सेवक आत्माराम आव्हाड, मिमचे नेते विजय शिरसागर , राष्ट्रवादी रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्ष मंजाप्पा गौडा, मुंबई प्रदेश अध्यक्ष सुरेश कुमार बिंद उपाध्यक्ष संजय लांडगे, अजय ठोंबे, प्रदिप गुंजाळ, रविंद्र म्हस्के,गौतम गायकवाड, व्यंकटेश गोसाई, राहुल कांबळे सागर ठाकूर ,गौतम कसबे, रफिक शेख, समाज भूषण पुरस्कार प्राप्त एम.बी.रणदिवे सर, समाज भूषण पुरस्कार प्राप्त विजय मोरे, समाजभूषण पुरस्कार प्राप्त उत्तम गायकवाड, ॲड . महेंद्र भिंगारदिवे, ॲड, अनिरुध्द रोटे, हिरामण खंडागळे, शाहीर शंकर खंडागळे, शाहिर भोरे, जगननाथ  कांबळे, भाऊसाहेब वरठे, मिलिंद कांबळे, समाज भूषण पुरस्कार प्राप्त कल्पना सूर्यवंशी युथ रिपब्लिकनचे मुंबई प्रदेश अध्यक्ष ॲड कनिष्क साबळे, ॲड फरदिन शेख, विकास निकाळजे,यश शिंदे, सागर जाधव ,सुनिल नाटेकर, आनंद नाडर, देवांश तपासे, अविनाश निकाळजे , आदित्य मोरे , अनिल नाटेकर, कैलाश निकाळजे, विकास निकाळजे,आणि संजय मगर इत्यादि मान्यवर उपस्थित असल्याचे पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रक समाजभूषण सो.ना.कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले.

Comments

Popular posts from this blog

Transport News

मुंबईच्या कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरूच

Mr. Vasudev Gaiyonde press कॉन्फरन्स