पार्ले पंचम
मुंबईत मराठी माणसाला घर देण्यासाठी आरक्षण ठेवा पार्ले पंचम संघटनेची मागणी मुंबई : प्रतिनिधी मुंबईत मराठी माणसाला घर देण्यासाठी बिल्डरांनी आरक्षण ठेवावे अशी मागणी पार्ले पंचम संघटनेचे अध्यक्ष श्रीधर खानोलकर यांनी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत केली. मुंबईत आज मराठी माणूस हताश निराश व अनाथ होत आहे मध्यंतरी गिरगावात येथील भूमिपुत्राला जो मराठी आहे म्हणून त्यास रोजगार नाकारण्याचा प्रकार घडला होता. असाच प्रकार नंतर मरोळ येथील गुजराती मालकाच्या कंपनीत काढला होता. मुलुंड येथे देवरुखकर नावाच्या उद्योजिकेला गुजराती बहुल सोसायटीत ती मराठी आहे म्हणून जागा नकारण्यात आली होती. तर मध्यंतरी विलेपार्ले पूर्व येथे देखील असा प्रकार घडला होता. तेथील शिवसेनेकांनी मोर्चा काढला होता. घाटकोपर येथील जगदुशहा नगर येथे मराठी माणसांना मालकीचे व भाड्याचे घर घेणे कठीण झाले आहे. मुंबईतील बहुतेक ठिकाणी मांसाहारी म्हणून मराठी माणसांना घरी नाकारण्याचा प्रकार फार मोठ्या प्रमाणात होत आहे. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी तीन पक्ष कार्यरत असताना मुंबईत मराठी माणसाची अवस्था बिकट झाली असल्याची खंत श्रीधर खानोलकर यांनी व्यक्त केली. मुंबईत ठीकठिकाणी होत असलेल्या पुनर्विकासाच्या कामांमध्ये बांधकाम व्यवसायिकांनी मराठी माणसाला घर संदर्भात आरक्षण ठेवावे अशी मागणी पार्ले पंचम संघटनेच्या वतीने आम्ही केली असल्याची माहिती संघटनेचे उपाध्यक्ष बबन नाक्ती यांनी केली सरकारने मुंबईत मराठी माणसासाठी सरकारी वसाहती निर्माण कराव्यात. मराठी सरकारी कर्मचारी पोलीस कर्मचारी यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात घर बांधणी व्हावी. मुंबईतील मध्यभागी होणाऱ्या धारावी प्रकल्पात 70 ते 75 टक्के घर मराठी माणसांना राखीव ठेवावीत अशी ही मागणी यावेळी करण्यात आली. सदरच्या पत्रकार परिषदेमध्ये मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण हे देखील उपस्थित होते. त्यांनी यावेळी सांगितले की, सिंगापूरमध्ये भूमिपुत्रांसाठी सरकारी पातळीवर घर बांधणी करण्यात आले आहे. मलेशियन सरकारने देखील लोक गृहनिर्माण योजना व वन मलेशिया लोकगृहनिर्माण योजना असे प्रकल्प राबवली आहेत. अगदी मुंबईत देखील भेंडीबाजार पुनर्विकास प्रकल्प हा दाऊदी बोरा समाजासाठी बांधला जात आहे. त्यामुळे मुंबईत मराठी माणसाला घरामध्ये बिल्डर आणि आरक्षण देणे गरजेचे आहे. मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायासंदर्भात सरकार दरबारी पाठपुरावा करण्यासाठी आमची संघटना पार्ले पंचम सोबत राहील.
Comments
Post a Comment