शिवडी पोलिसांकडून 100 कोटीहून पेक्षा अधिक घोटाळ्याचा तपास थंडावला
कालकाई घोटाळ्याचा तपास थंडावला कालकाई संपर्क सेवा समितीची माहिती मुंबई प्रतिनिधी सुमारे 100 कोटीपेक्षा अधिक उलाढाल झालेल्या कालकाई इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मार्फत शेकडो गुंतवणूकदारांना फसवणूक करून झालेल्या घोटाळ्याचा तपास थंडावला आहे अशी माहिती कालकाई संपर्क सेवा समितीचे सचिव श्री राजेश सावंत यांनी दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जवळपास 3 महिन्याचा कालावधी होऊनही मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा वर्ग होत नसल्याने किडवाई पोलीस स्टेशन, शिवडी यांच्या विरोधात आता मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे न्याय मागण्याची वेळ आता आली आहे.
किडवाई पोलीस स्टेशन यांच्याकडे FIR दाखल होऊनही जवळपास 10 महिन्याचा कालावधी होऊनही आणि सदर गुन्ह्याची व्याप्ती 100 ते 150 करोड असूनही अजूनपर्यंत eow यांच्या कडे गुन्हा दाखल न झाल्याने समितीचे सचिव राजेश सावंत यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
शेवटचा पर्याय म्हणून आता पोलीस आयुक्त, मुंबई यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाने त्यांच्याकडे मांडणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले आहे. तसेच किडवाई पोलीस स्टेशन या प्रकरणात वेळ काढून धोरण अवलंबत आहे असा संशय गुंतवणूकदारांनी व्यक्त केला आहे.
Comments
Post a Comment