सरपंचांचे मानधनात वाढ केल्याबद्दल महायुतीच्या सरकारच सरपंचांकडून अभिनंदन

सरपंचांचे मानधन वाढवल त्याबद्दल सरकारचे आभार      मुंबई :  प्रतिनिधी

  आपण सरपंच व उपसरपंच यांना मानधन वाढविलेत त्याबद्द्ल आपले धन्यवाद.परंतु आपण ग्रामपंचायत सदस्यांना काहीच मानधन वाढविले नाही.तरी एका ग्रामपंचायतीमध्ये किमान सात 7 सदस्य असतात त्यांना कोणीच सही शिवाय विचारात घेत नाही इथे शासनाने सुद्धा विचारात घेतले नाही.

   तरी आपण सर्व सरपंच यांना दहा हजार 10000 रुपये उपसरपंच यांना सात हजार 7000 रुपये व सदस्यांना पाच हजार 5000 रुपये मानधन देण्यात यावे.

    आरक्षण व आर्थिक परस्थितीमुळे काही सरपंचांना चांगल्या घराचा प्रश्न असतो तरी सर्व सरपंच यांना प्रत्येक गावात *सरपंच भवननिवास_व्यवस्था करण्यात यावी.  

 _ग्रामसेवक यांना गावात राहणेसाठी ग्रामसेवक भवन_ बांधणेत यावे

        तालुका,जिल्हा व राज्य पातळीवर मुंबईत ग्रामपंचायत कामानिमित्त आलेल्या सर्व सरपंच उप सरपंच यांना विश्रांती व थांबणे साठी सरपंच निवासाची व्यवस्था करण्यात यावी. सरपंच भवन बांधणेत यावे महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था असावी.

      आजी माजी सरपंच, उप सरपंच यांना शासकीय ओळखपत्र देणेत यावे.या ओळख पत्रान्वये आमदार निवास व मंत्रालयात प्रवेश देणेत यावा.

        आरक्षण जागेवर निवडून आलेल्या सदस्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेत सादर करण्याचे बंधन घालण्यात आले आहे खरेतर ग्रामीण भागातील ही मंडळी गरीब असतात त्यामुळे ही जबाबदारी समाज कल्याण विभाग यांचेवर बंधन कारक करणेत यावी,कारण प्रस्ताव सादर करतेवेळी परिपूर्ण व सर्व कागपत्रांची छाननी करून समाज कल्याण विभागाने प्रस्ताव स्वीकारलेला असतो. तसेच विजयी, पराभव व अर्ज माघार घेतलेल्या सर्वांनाच जातपडताळणी प्रमाणपत्र देण्यात यावे कारण ग्रामीण भागातील ही मंडळी गरीब असतात जेणेकरून भविष्यात मुलांच्या शैक्षणिक व नोकरीकामी मदत होईल, व प्रस्ताव सादर करतेवेळी आर्थिक खर्च व कागदपत्र जमा करणेसाठी फार त्रास झालेला असतो.तरी सर्वांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळावे.

      सर्वांना पेन्शन योजना लागू करावी. 

    दोन  उपसरपंच नेमणुकीस मान्यता देण्यात यावी. 

      घरबांधणे, जमीन व गाडी घेणेसाठी 200000 वीस लाख रुपये पर्यंत बिगर व्याजी कर्ज मिळावे.

      दहा 10 लाख रुपये पर्यंत आरोग्य सुविधा व विमा संरक्षण मिळावे.

      पूर्वी सर्व लोक गावठाण हद्दीत एकत्र राहत होते आता वाडी वस्ती व शेतात एकत्र वाडी वस्ती करून रहात असलेमुळे फक्त गावठाण हि अट रद्द करून प्रत्येक ward प्रभागात निधी खर्च वाटप करण्यात यावे. 

           ग्राम पंचायतीला कोणी जागा जमीन दान देत असेल तर त्यास पुर्ण पणे खरेदी खर्च/स्टँप ड्युटी माफ करणेत यावी . 
                                             तसेच गावातील धार्मिक,अध्यात्मिक, व सांस्कृतिक वातावरण सौहार्द पूर्ण ठेवणेसाठी नेहमी *भजनी मंडळे अग्रेसर असतात तरी त्यांना कलाकार मानधन योजनेतून आर्थिक मदत व वयोवृध्द भजनी मंडळीना पेन्शन चालू करणेत यावी. 

 श्री भाऊसाहेब बळवंतराव पाटील
 *उपसरपंच ग्रामपंचायत* ढालेवाडी.
  मुख्यमंत्री माझी शाळा आदर्श सुंदर शाळा तृतीय पारितोषिक प्राप्त जि. प. शाळा ढालेवाडी, तालुका. कवठेमहांकाळ, जिल्हा. सांगली

Comments

Popular posts from this blog

Transport News

मुंबईच्या कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरूच

Mr. Vasudev Gaiyonde press कॉन्फरन्स