adv. Ravi jadhav
एडवोकेट रवी जाधव यांनी वंचित आघाडी तर्फे कुलाबा मतदारसंघातून भरला उमेदवारी अर्ज मुंबई : प्रतिनिधी मुंबई काँग्रेसचे नेते एडवोकेट रवी जाधव यांना काँग्रेस तर्फे तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी वंचित आघाडी तर्फे कुलाबा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अशी माहिती त्यांनी स्वतः मंगळवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. एडवोकेट रवी जाधव यांनी सांगितले की, महायुतीप्रमाणे काँग्रेसमध्येही उमेदवारीसाठी पैशाचा घोडेबाजार सुरू आहे. गेल्या एक वर्षापासून मी कुलाबा मतदारसंघात काँग्रेस तर्फे कार्य करत आहे या ठिकाणी काम करत असताना जनतेचा मला चांगला पाठिंबा मिळत आहे असे असताना मला सोडून काँग्रेसने इतर कार्यकर्त्याला उमेदवारी दिली सदरची उमेदवारी ही पैसे घेऊन देण्यात आली असा माझा स्पष्ट आरोप आहे. असो परंतु, आता मी बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी तर्फे कुलाबा मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहे त्यामुळे माझ्या तमाम प्रेमींनी मला सहकार्य करावे असे आवाहन रवी जाधव यांनी केले.
Comments
Post a Comment