भोई समाज
अजून पाच समाजाला महामंडळे भोई समाजाला सरकारने डावलले
भोई समाजाला जर संत भीमा भोई आर्थिक विकास महामंडळ सरकार देतं नसेल तर निवडणुकीत या सरकारला धडा शिकविल्या शिवाय भोई समाज स्वस्थ बसणार नाही--भाऊसाहेब बावणे
मुंबई:- राज्यातील विविध समाज घटकांसाठी वेगवेगळी महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला. परंतु भोई समाजाची अनेक वर्षापासून असलेली संत भिमाभोई आर्थिक विकास महामंडळ,स्थापन करण्याच्या मागणी कडे सरकारने लक्ष दिले नाही. जर सर्वच समाजांच्या विकासा करीता महामंडळे स्थापन होत आहेत तर मग आमच्या समाजाचा विकास झाला नाही पाहिजे असे सरकारला वाटते का?असे असेल तर या सरकारला मतदान करण्याचा भोई समाजाला कोणताही अधिकार नाही.सरकार आमच्या समाजाला आर्थिक विकास महामंडळ जर देत असेल तर आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहू त्या नंतर हा स्वाभिमानी समाज सरकार विरोधात सामूहिक मतदाना बाबत आपला निर्णय घेईल. यापूर्वी आठ समाजाला महामंडळे देण्यात आली आहे आणि आता अजून
त्यात या समाजाला मंडळे देण्यात आली त्यात लाडशाखीय वाणी, वाणी समाजासाठी सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ, लोहार समाजासाठी ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ, शिंपी समाजासाठी संत नामदेव महाराज आर्थिक विकास महामंडळ, गवळी समाजासाठी श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ त्याचप्रमाणे लोहार आणि नाथपंथीय समाजासाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या महामंडळांना प्रत्येकी ५० कोटी रुपयांचे भागभांडवल दिले जाईल.आमच्या समाजाचा जर कोणी सरकार विचार करत नसेल तर निवडणुकीत या सरकारला धडा शिकविल्या शिवाय भोई समाज स्वस्थ बसणार नाही असा इशारा राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारतीय जन सम्राट पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब बावणे यांनी सरकारला दिला आहे
Comments
Post a Comment