चुनाभट्टीच्या सोमय्या मेडिकल कॉलेजचे प्रभारी दिन डॉक्टर शरद कुमार सावंत यांना समाज भूषण जीवनगौरव पुरस्कार
चुनाभट्टीच्या सोमय्या मेडिकल कॉलेजचे प्रभारी डीन डॉ. शरद कुमार सावंत यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
मुंबई : प्रतिनिधी चुनाभट्टीतील सुप्रसिद्ध के.जी. सोमया मेडिकल कॉलेजचे विभाग प्रमुख व प्रभारी डीन डॉ. शरदकुमार प्रल्हाद सावंत यांना नवी मुंबईच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने यावर्षीचा समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये पार पडणाऱ्या या सोहळ्यामध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्र आणि सामाजिक जाणीवेतून काम करणारे डॉ. सावंत त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष चंद्रकांत जगताप यांनी दिली आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात डॉक्टरांना मार्गदर्शन करून त्यांना प्रशिक्षित केल्यामुळे त्यांना उत्कृष्ट डॉक्टर टीचर म्हणून गौरविण्यात आले आहे. ते पीएचडी गाईड म्हणून सुप्रसिद्ध आहेत. २३५ अशी विक्रमी आर्टिकल्स त्यांनी दिली आहेत. तीन इंटरनॅशनल मेडिकल जनरलच्या संपादक कमिटीवर सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. कोरोना काळामध्ये वसाहती पातळीवर त्यांनी जीवाची बाजी लावून आरोग्य सेवा केली. त्यांना आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट संशोधक पुरस्कार ही प्राप्त झाला आहे. त्यांचे वडील प्रल्हाद सावंत यांचे आंबेडकरी चळवळीत भरीव योगदान असून सांगोला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णांकित पुतळा उभारण्यासाठी त्यांची महत्वपूर्ण कामगिरी आहे. आंबेडकरी चळवळीच्या विचारांचा वारसा असल्याने त्याच सामाजिक जाणीवेतून आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये सामाजिक भान घडविणारे डॉक्टर घडवित असल्याबद्दल समाजाकडून माझा गौरव होत आहे, हाच माझ्यासाठी महत्त्वपूर्ण सन्मान म्हणावा लागेल, अशी प्रतिक्रिया डॉ. शरद कुमार सावंत यांनी बोलताना दिली आहे.
Comments
Post a Comment