मुंबईच्या कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरूच
उमेद कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी आझाद मैदानात आंदोलन सुरू
८४ लाख ग्रामीण कुटुंबांच्या उज्वल भवितव्यासाठी शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राजbविभागांतर्गत 'उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत २८०४ कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे. उमेद संघटनेच्या वतीने दिनांक ०७ ऑक्टोबर २०२४ रोजीपासून आझाद मैदान येथे प्रभाकर गावडे संघटनेचे मार्गदर्शक तथा कृती समिती सदस्य आमरण उपोषणाला बसले असून सर्व महिला व स्टाफ धरणे आंदोलनात सहभागी झालेले असून शासनाकडून मागणी पूर्ण झाल्याचा शासन निर्णय घेतल्याशिवाय दसऱ्याला घरी जाणार नाही या निर्धाराने लाखो महिला मुंबईत येत आहेत.
आपण आमच्या राज्याचे कुटुंबप्रमुख, आधार, पालक, लोकप्रतिनिधी म्हणून आपणास नम्रपणे विनंती करण्यात येते की वरील एकमेव न्याय मागणीच्या पूर्ततेसाठी सोबत दिलेल्या प्रस्तावाप्रमाणे पूर्ण होणेसाठी आपण आम्हा ८४ लाख कुटुंबाना न्याय मिळवून देणेसाठी मा. मत्रीमंडळात निर्णय घेऊन संबंधिताना मागणी पूर्ततेचा शासन निर्णय दिनांक दि. ११ ऑक्टोबर २०२४ रोजीपर्यंत काढून अंमलबजावणी आदेश निर्गमित करावा यासाठी आदेशित करणेसाठी आमचे प्रतिनिधी आधार म्हणून आझाद मैदान येथे उपस्थित राहून आम्हाला पाठींबा द्यावा व आम्हाला न्याय मिळवून देणेसाठी मागणीबाबत प्रचार प्रसार करून मार्गदर्शन करावे. जेणेकरून आम्ही दसऱ्याच्या सणाला घरी जाता येईल. ही नम्र विनंती. उक्त मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही न्यायासाठी संविधानिक पद्धतीने दि. ०३ ऑक्टोबर २०२४ रोजीपासून बेमुदत कामबंद आंदोलनात उमेद अभियानातील कंत्राटी अधिकारी, कर्मचारी, सर्व समुदाय संसाधन व्यक्ती व सर्व स्वयंसहाय्यता समूहातील महिला लाखोंच्या संख्येने सहभागी असून आमची एकमेव मागणी मान्य करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी अधून-मधून येथे बसलेला सर्व उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली.
Comments
Post a Comment