डॉ. विजय जंगम

सरकारला धडा शिकवा फक्त वीरशैव लिंगायत समाजाच्या उमेदवारालाच निवडून द्या - डॉ विजय जंगम यांचे आवाहन                                                      मुंबई :  प्रतिनिधी                                              आगामी विधानसभा निवडणूक -२०२४ लक्षात घेता आपल्याला महासंघातर्फे सर्वच राजकीय पक्षांकडे विशेष मागणी करणे आवश्यक आहे. नेहमीप्रमाणेच यावेळीही वीरशैव लिंगायत समाजाला विद्यमान सरकारने वाटाण्याच्या अक्षता दिल्यात व सर्वच निवेदनांना केराची टोपली दाखवली त्यामुळे फक्त वीरशैव लिंगायत समाजाचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी उभे असतील त्यांना मतदान करावे असे आवाहन डॉ. विजय जंगम यांनी केले आहे.                        आचारसंहीता लागू होण्यापूर्वी विद्यमान सरकारने जवळपास ८० पेक्षा जास्त शासननिर्णय लागू केलेत मात्र यावेळी वीरशैव लिंगायत समाजाच्या एकाही मागणीचा विचार केला गेला नाही. सुरुवातीपासूनच महासंघाची स्पष्ट व ठाम भूमिका आहे की कोणत्याही राजकीय पक्षाला थेट पाठींबा देता येणार नाही. समाजाला गृहीत धरुन एकगठ्टा मतांचा घोडेबाजार खपवून घेतला जाणार नाही, ही गोष्ट महासंघाच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. व तशी स्पष्ट सूचना आपापल्या विभागातील राजकीय पक्षांना देणे आवश्यक आहे. वीरशैव लिंगायत समाज हा कधीही कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला बांधता येणार नाही आणि हे चालू देणार नाही. आगामी निवडणूकीत जो राजकीय पक्ष आपल्या जाहीरनाम्यात/ वचननाम्यात स्पष्टपणे वीरशैव लिंगायत समाजाबाबत असलेले प्रश्न मार्गी लावण्याबाबत वचन देईल त्या पक्षाला त्यांच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करुन समाजाला आवाहन करता येईल(कुठल्याही प्रकारची मतदानाची हमी देता येणार नाही). महासंघाचा जो कोणी पदाधिकारी किंवा कार्यकर्ता समाजाला गृहीत धरून जर कुठल्याही राजकीय पक्षासोबत हातमिळवणी करुन मतदानाचा व्यवहार करेल त्याला तातडीने महासंघातून बडतर्फ करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी, असे डॉ. विजय जंगम यांनी सांगितले आहे.

महासंघातर्फे वीरशैव लिंगायत समाजाच्या प्रमुख मागण्याः 
 वीरशैव लिंगायत हे केवळ हिंदूच आहेत, त्यांना स्वतंत्र धर्म मान्यता देणार नाही ही ठाम भूमिका. 
 वीरशैव लिंगायत समाजातील सर्वच जाती / पोटजातीतील OBC आरक्षणाचा मुद्दा तातडीने निकाली काढावा. 
 वीरशैव लिंगायत समाजातील इतर मागास वर्गीय व SC/ST याबाबत संभ्रम असून शासनाने सुधारीत पत्रक काढून ज्या समाजबांधवांकडे जे जातप्रमाणपत्र उपलब्ध आहे ते कायम करुन द्यावे. 
 ⁠महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला स्वायत्त दर्जा द्यावा व भरीव निधी द्यावा. 
 ⁠केंद्र सरकारकडून वीरशैव लिंगायत समाजासाठी विशेष निधीसाठी मागणी. 
 ⁠मुंबई येथे आद्य जगद्गुरु रेणूकाचार्य, 
महात्मा बसवेश्वर, संतशिरोमणी मन्मथ स्वामी महाराज, अक्का महादेवी, राणी चेन्नम्मा, संत लक्ष्मण महाराज आदी महापुरुषांचे भव्य संयुक्त स्मारक. 


वरीलप्रमाणे मजकूर आपापल्या लेटरहेड वर तयार करुन आपापल्या विभागातील राजकीय पक्षाच्या प्रमुखांना द्यावा. यावेळी वीरशैव लिंगायत समाज शांत बसणार नाही. संयम पाळतो म्हणून कोणत्याही राजकीय पक्षाने आमच्या समाजाला गृहीत धरु नये ही ठाम भूमिका सर्वच राजकीय पक्षांकडे पोहचली पाहीजे. 

महाराष्ट्रातील कोणत्याही मतदार संघात वीरशैव लिंगायत समाजाचा कोणताही उमेदवार / कोणत्याही राजकीय पक्षातून जर निवडणूक लढवत असेल तर त्या उमेदवाराला भरभरून पाठींबा द्यावा , असे आवाहन 
डॅा. विजय जंगम(स्वामी)
राष्ट्रीय कार्याध्यक्षः अखिल वीरशैव लिंगायत महासंघ यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

Transport News

मुंबईच्या कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरूच

Mr. Vasudev Gaiyonde press कॉन्फरन्स