संविधान जागर समिती
संविधान जागर समितीतर्फे घरघर संविधान अभियान मुंबई : प्रतिनिधी संविधान जागर समितीच्या वतीने यंदा 26 सप्टेंबर ते 26 नोव्हेंबर 2024 या कालावधीत घर घर संविधान अभियान राज्यभरात राबवले जाणार असल्याची माहिती संविधान जागर समितीचे नेते नितीन भाऊ मोरे यांनी मंगळवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. अभियानाच्या अंतर्गत राज्यभर विविध कार्यक्रम उपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत तसेच यानिमित्त घरोघरी संविधान तसेच पुस्तिका वितरित करून संविधानिक मूल्यांचा प्रसार केला जाणार आहे संविधानाच्या बद्दल काही लोक हेतू पुरस्कार खोटी माहिती पसरवित आहेत. नागरिकांमधील गैरसमज दूर करून योग्य व वास्तव माहितीचे जागरण या अभियानाद्वारे होईल. संविधान जागर समितीमध्ये राज्यातील अनेक संस्था, संघटना एकत्र आलेले आहेत. व याद्वारे हे अभियान राबविले जाणार आहे. राज्य सरकारकडून नुकतीच या अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने नागरिकांनी 100 टक्के मतदान करण्याच्या आवाहन देखील या निमित्ताने करण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ माजी खासदार ब्रिज लालजी माजी पोलीस महासंचालक उत्तर प्रदेश तथा माजी अध्यक्ष अनुसूचित जाती व जमाती आयोग उत्तर प्रदेश यांच्या शुभहस्ते व श्री. दिलीप कांबळे माजी मंत्री तथा अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ यांच्या उपस्थितीत वाल्मिकी आश्रम, मिलिंद नगर, रिव्हर रोड पिंपरी येथे संपन्न झालेला आहे. या घर घर संविधान अभियानात नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभागी व्हावे व प्रत्येक घरापर्यंत व घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत संविधानाचा जागर करावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले.
Comments
Post a Comment