BEST Bus news
संघर्ष कामगार कर्मचारी युनियनचा आझाद मैदानात भव्य मोर्चा मुंबई : प्रतिनिधी संघर्ष कामगार कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली काल , मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी, २०२५ रोजी, आझाद मैदान येथे मोठ्या प्रमाणावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात एस.एम.टी.ए.टी.पी.एल. असोसिएट्स (डागा ग्रुप), मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट सोल्यूशन्स प्रा. लि., बी.व्ही.जी. इंडिया लि. व इतर खाजगी कंपन्यांमार्फत चालविण्यात येणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या मोर्च्याचे मुख्य उद्देश "समान कामाला, समान दाम" या तत्त्वाची अंमलबजावणी करणे व इतर रास्त मागण्या मांडणे हे होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागात सार्वजनिक बससेवा देण्यासाठी कायम सेवेत असलेले / पटावर असलेले कामगार कर्मचारी करीत असलेले काम व एस.एम.टी.ए.टी.पी.एल. असोसिएट्स (डागा ग्रुप), मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट सोल्यूशन्स प्रा. लि., बी.व्ही.जी. इंडिया लि. व इतर कंपन्यांमार्फत चालविण्यात येणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे काम तंतोतंत सारख...