BEST Bus news

संघर्ष कामगार कर्मचारी युनियनचा आझाद मैदानात भव्य मोर्चा
मुंबई : प्रतिनिधी 
संघर्ष कामगार कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली काल , मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी, २०२५ रोजी, आझाद मैदान येथे मोठ्या प्रमाणावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात एस.एम.टी.ए.टी.पी.एल. असोसिएट्स (डागा ग्रुप), मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट सोल्यूशन्स प्रा. लि., बी.व्ही.जी. इंडिया लि. व इतर खाजगी कंपन्यांमार्फत चालविण्यात येणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या मोर्च्याचे मुख्य उद्देश "समान कामाला, समान दाम" या तत्त्वाची अंमलबजावणी करणे व इतर रास्त मागण्या मांडणे हे होते.  
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागात सार्वजनिक बससेवा देण्यासाठी कायम सेवेत असलेले / पटावर असलेले कामगार कर्मचारी करीत असलेले काम व एस.एम.टी.ए.टी.पी.एल. असोसिएट्स (डागा ग्रुप), मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट सोल्यूशन्स प्रा. लि., बी.व्ही.जी. इंडिया लि. व इतर कंपन्यांमार्फत चालविण्यात येणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे काम तंतोतंत सारखेच असल्याने, या कामगारांना "समान कामाला, समान दाम" या तत्त्वानुसार बेस्ट उपक्रमामधील समकक्ष कायम व नियमित कामगारांना लागू असलेले वेतनमान व इतर सेवाशर्ती तातडीने लागू करण्यात यावे.  याखेरीज इतर रास्त मागण्यांबाबतही तातडीने निर्णय घेण्यात यावा.  
या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
संघर्ष कामगार कर्मचारी युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी या मोर्च्याचे नेतृत्व केले. त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे विनंती केली की, खाजगी कंपन्यांमार्फत चालविण्यात येणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांवर कार्यरत असलेल्या कामगारांच्या या रास्त मागण्यांबद्दल तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन अंमलबजावणीचे आदेश द्यावेत.  

आझाद मैदानावर जमलेल्या कर्मचाऱ्यांनी एकजुटीने आपल्या मागण्या मांडल्या. या मोर्च्यात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी नारेबाजी केली व जाहीरनामे वाटप केले.  

संघर्ष कामगार कर्मचारी युनियनने स्पष्ट केले आहे की, जर त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले गेले नाही तर त्यांची लढा पुढे चालू राहील. युनियनने बृहन्मुंबई महानगरपालिका व इतर संबंधित अधिकाऱ्यांकडे या मागण्यांचा तातडीने विचार करण्याची मागणी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

Transport News

मुंबईच्या कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरूच

Mr. Vasudev Gaiyonde press कॉन्फरन्स