warli news

वरळी बांधकाम व्यवसायिक धमकी प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण?                                   मुंबई : प्रतिनिधी                                      वरळी येथील दहा कोटीच्या खंडणी प्रकरणामागील मुख्य सूत्रधार कोण?, याचा शोध लागणे गरजेचे असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे त्यांनी शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.              एस.आर.ए. गृहनिर्माण संस्था मर्यादित,आदर्श नगर, कोळीवाडा रोड, वरळी, मुंबई या सोसायटी  तफै  ऍड. निलेश पांडे तसेच  श्री गोविंद कामतेकर (समन्वयक सागर दर्शन सोसायटी ) सोसायटीचे १२५ ते १५० महीला आणि पुरुष  सभासद उपस्थित होते. ऍड.आकाश पांडे  तसेच गोविंद कामतेकर यांनी पत्रकार आणि मीडिया यांच्याशी संवाद साधताना सांगितले की, आमचा प्रकल्प १९९६ पासून रखडलेला होता,या रखडलेल्या प्रकल्पाला मार्गी लागावा म्हणून विकासक सन 2020 मध्ये मे. चितांहरणी चितपुरनी रिअलर्ट्स एल.एल.पी यांची संस्थेचे विकासक यांनी पुढाकार घेऊन हा प्रकल्प हाती घेतला आणि आम्ही सर्वानुमते त्यांची  निवड केली.जेव्हापासून  त्यांनी प्रकल्प हाती घेतला तेव्हापासुन आमच्या संस्थेच्या विकासकांनी आजवर उत्तमरित्या कार्य करत पुनर्वसन प्रकल्पाला आवश्यक असलेल्या झोपू प्राधिकरणाच्या व इतर प्राधिकरणाच्या सर्व परवानगी प्राप्त केल्या व त्यानंतर सर्व झोपडीधारक सदस्यांची सभा बोलावुन विकासकांनी प्राप्त केलेल्या सर्व परवानगी सभेसमोर मांडल्या, त्याअनुषगांने पुनर्वसन प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा याकरिता संस्थेचा संपुर्ण भुखंड विकासकांना मोकळा करून द्यावा, असा ठराव सर्वानुमते मंजुर करुन संमत करण्यात आला असल्याचे श्री.गोविंद कमतेकर यांनी सांगितले.
        वरळी आदर्श नगर कोळीवाडा येथे एस.आर.ए.सागर दर्शन हा प्रकल्प मोठ्या जोमाने म्हणून सदर प्रकल्प बंद पाडण्यासाठी काही समाजकंटकांनी एस.आर.ए तसेच पोलीस व विविध एजन्सीना खोट्या तथ्यहीन तक्रारी करून बिल्डर आकाश गुप्ता यांच्या वर दबाव निर्माण केला आणि चालू प्रकल्प बंद पाडू अशी धमकी देऊन मागच्या आठवड्यात 10 कोटी रुपये खंडणी मागितली होती.आणि ते पैसे घेण्यासाठी नवघर पोलिस ठाणे हद्दीत बोलावले,त्यामुळे त्यांच्यावर नवघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आणि नवघर पोलिसांनी बिल्डर आकाश गुप्ता यांच्याकडून मागितलेल्या खंडणीप्रकरणी खंडणीखोर स्वप्निल बांदेकर हा नालासोपारा येथील माजी नगरसेवक आहे. तो उबाटा गटाचा असल्याचे कळते. हिमांशू शहा, किशोर काजरेकर, निखिल बोलारे या तिघांना देखील अटक करण्यात आलेली आहे, त्यांना १० तारखेपर्यंत पोलिस कोठडी न्यायाधीशाने सुनावली आहे.
  विरोध करणारे लोकांपैकी आमच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाशी काडीमात्र संबंध नसलेली महिला " रा.ठी. कांदिवली व पुरुष नामे श्री. स्वप्नील बांदेकर रा.ठी. नालासोपारा हे आमच्या प्रकल्पाबाबत अनेक ठिकाणी खोट्या तक्रारी करत आहे. तसेच झो. पू प्राधिकरण व इतर प्राधिकरणाकडे सतत माहिती अधिकाराचा गैरवापर करुन 239 सर्वसामान्य कुटुबियांचा मार्गी लागत असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात अडथळा निर्माण करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न करण्यात येत आहे .ज्या व्यक्तींचा आमच्या प्रकल्पाशी कोणताही संबंध नाही अश्या व्यक्ती आमच्या पुनर्वसन प्रक्रियेत हस्तक्षेत का करत आहेत ? याचा उलघडा होणे फार गरजेचे आहे. आमच्या प्रकल्पाशी कोणताही संबंध नसलेल्या व्यक्ती "माहिती अधिकार कार्यकर्ते" नावाखाली विकासकावर दबाव आणत धमक्याद्वारे खंडणी उकळणारी ही टोळी असण्याची दाट शक्यता आहे असे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. सदरची बाब अतिशय गंभीर स्वरुपाची असुन समाज विकासाच्या दृष्टिने अतिशय घातक आहे.
वर नमूद आरोपी हे कांदिवली,वसई सारख्या ठिकाणी राहणारी आहेत मग यांना वरळी मध्ये होणाऱ्या प्रोजेक्ट ची माहिती कोण देते तर त्यांना माहिती देणारा हा आमच्या बाजूच्या सोसायटी मध्ये राहणार कृष्णा पेरुरकर आणि त्याची माणसे करतात. कृष्णा हा वर नमूद गुन्ह्यातील  पाहिजे आरोपी आहे .,कृष्णा पेरुरकर सारखी माणसे RTI सारख्या कायद्याचा चुकीचा वापर करतात तरी आमची अशी मागणी आहे की,आमच्या पुनर्वसन प्रकल्पाबाबत कोणतीही 'तक्रार' अथवा 'माहिती अधिकार अर्ज प्राप्त झाल्यास, अर्ज करणारी व्यक्ती वरळी आदर्श नगर, सागर दर्शन सहकारी गृहनिर्माण संस्थेशी संबंधित आहे किवा नाही याची खातरजमा करण्यात यावी व प्रकल्पाशी संबंधित नसलेल्या कोणत्याही व्यक्तींना प्रकल्पाची कोणतीही माहीती पुरविण्यात येऊ नये व अश्या व्यक्तीनी पुनर्वसन प्रकल्पात बाधा आणण्याच्या दृष्टीकोनातुन दाखल केलेल्या कोणत्याही स्वरुपाचे अर्ज/तक्रारीची याची आपल्या मार्फत दखल घेऊ नये. अन्यथा संस्थेच्या वतीने संबंधित व्यक्ती विरोधात मोर्चा काढून जनआंदोलन केले जाईल याची आपण गंभीर नोंद घ्यावी.
 वर नमूद बाब ही फक्त खंडणी साठी नसून यांच्यासारखी माणसे काही राजकारण्यांशी काम करतात आणि हीच माणसे RTI तसेच इतर कायद्याच्या मदतीने प्रोजेक्ट हाई जॅक करण्याचे काम करतात.तरी सरकारने ह्या गोष्टीची दखल घेऊन  ह्या अश्या लोकांवर कारवाई करून विकासाचे मार्ग मोकळे करावे,असे ऍड.निलेश  पांडे यांनीसांगितले.

Comments

Popular posts from this blog

Transport News

मुंबईच्या कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरूच

Mr. Vasudev Gaiyonde press कॉन्फरन्स