सामाजिक कार्यकर्ते अशोक टाव्हरे यांची पत्रकार परिषद
न्यायमूर्ती डॉक्टर चंद्रचूड यांनी आपले शब्द फिरवू नये - सामाजिक कार्यकर्ते अशोक टाव्हरे
मुंबई : प्रतिनिधी मा.सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या खटल्याबाबतचा निकाल सन २०१९ मध्ये दिला होता.पाच न्यायमुर्तींच्या खंडपीठात न्या.डाॅ.चंद्रचूड यांचा समावेश होता.कनेरसर येथील २० ऑक्टोबर २०२४ रोजीच्या सभेतील भाषणात न्या.डाॅ.धनंजय चंद्रचूड यांनी अयोध्या निकालापुर्वी मार्ग सुचत नव्हता,त्यामुळे देवापुढे बसलो होतो असे वक्तव्य केले होते. सदर वक्तव्य त्यांनी फिरवू नये अशी मागणी मंगळवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्ते अशोक टाव्हरे यांनी केली आहे. हिंदु व मुस्लीम धर्मातील खटल्याबाबत असे विधान पाच वर्षांनी त्यांनी केले होते.सरन्यायाधीशच गुणवत्तेऐवजी देवाला मार्ग विचारत आहे यामुळे देशभरात टीका झाली होती.
याबाबत वर्तमानपत्रातून बातम्याही प्रसिध्द झाल्या होत्या.
मा.सरन्यायाधीश डाॅ.चंद्रचूड यांच्या कनेरसर येथील सभेत महिला अत्याचार प्रकरणातील आरोपीचा मुक्त वावर होता,त्यांच्या भाषणावेळी मागे उभा होता,टाव्हरे यांनी याबाबत दोषींवर कारवाईची मागणी केली होती;परंतु सरकारी कार्यक्रम नव्हता असे सांगून टाळाटाळ केली जात आहे.
दि.१४/०२/२०२५ रोजी काही वर्तमानपत्रांमध्ये बातम्या प्रसिध्द झाल्या असून बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत राममंदिराच्या निकालापुर्वी देवाला प्रार्थना केली नाही,सोशल मिडीयावर चुकीचे आले असे वक्तव्य केल्याचे बातमीत नमुद आहे.
दि.२० ऑक्टोबर रोजी कनेरसर ता.खेड येथे सभेत अयोध्या खटल्याबाबत वक्तव्य केले होते.
मा.सरन्यायाधीश
यांनी राममंदिर निकालापुर्वी देवापुढे बसणे,प्रार्थना करणे याचा स्वयंस्पष्ट व्हीडीओ आहे.
भारताचे मा.सरन्यायाधीश डाॅ.धनंजय चंद्रचूड यांनी देशापुढे कनेरसर ता.खेड जि.पुणे येथील सभेत अयोध्येबाबत केलेल्या वक्तव्याचा व्हीडीओ व बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य केले नसल्याची भुमिका यावरून निर्माण झालेला संभ्रम दुर करून सत्य काय आहे. ते देशाला सांगावे असे कवी-लेखक,सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी सांगितले.
Comments
Post a Comment