मुंबई हल्ला 26/11 news

मुंबईवरील 26/ 11 च्या हल्ल्यातील खतरनाक दहशतवादी तहव्वुर राणाला भारताकडे सोपवणार; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

वॉशिंग्टन : प्रतिनिधी                            भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवसीय अमेरिका दौऱ्यावर असून त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यात प्रामुख्याने मुंबईतील २००८ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपीचं प्रत्यार्पण करण्याची मंजुरी ट्रम्प प्रशासनाने दिली आहे. 

मोदी-ट्रम्प भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या कटातील सूत्रधार तहव्वुर राणा याच्या प्रत्यार्पणाला आम्ही मंजुरी देत आहोत. राणाला न्यायाचा सामना करण्यासाठी भारतात जावं लागेल असं त्यांनी सांगितले. व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. आम्ही इथं आणि भारतात बराच वेळ एकत्र राहिलो आहे. ५ वर्षापूर्वी मी सुंदर देशात जाऊन आलो. तो माझ्यासाठी अविश्वसनीय काळ होता. अमेरिका आणि भारत यांच्यात विशेष नातं आहे. जगातील सर्वात जुनी आणि मोठी लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी फ्रेमवर्कची मी घोषणा करत आहे असं त्यांनी सांगितले.

मुंबई पोलिसांनी 26/11 दहशतवादी हल्ल्यासंबंधी आपल्या आरोपपत्रात तहव्वुर राणाच्या नावाचा समावेश केला होता. त्याच्यावर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI आणि दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबाचा सक्रीय सदस्य म्हणून काम केल्याचा आरोप आहे. चार्जशीटमध्ये राणावर आरोप आहे की, त्याने 26/11 दहशतवादी हल्ल्यााचा मास्टरमाइंड डेविड कोलमॅन हेडलीची मदत केली. मुंबईत कुठे-कुठे हल्ले करायचे, त्या जागांची रेकी तहव्वुर राणाने केली होती. प्लान बनवून पाकिस्तानी दहशतवाद्यांना सोपवला होता.

तहव्वुर राणा आणि डेविड कोलमॅन हेडली उर्फ दाउद सईद गिलानी बालपणीचे मित्र आहेत. हेडली एक अमेरिकी नागरिक आहे. त्याची आई अमेरिकी आणि वडिल पाकिस्तानी होते. अमेरिकी अधिकाऱ्यांनी ऑक्टोंबर 2009 मध्ये शिकागोमधून हेडलीला अटक केली होती. अमेरिकी कोर्टाने 24 जानेवारी 2013 रोजी हेडलीला मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्या प्रकरणी दोषी ठरवून 35 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. तहव्वुर राणाने पाकिस्तानच्या हसन अब्दाल कॅडेट स्कूलमध्ये शिक्षण घेतले. हेडलीने सुद्धा अमेरिकेत शिफ्ट होण्याच्या पाच वर्ष आधी तिथे शिक्षण घेतले होते.

Comments

Popular posts from this blog

Transport News

मुंबईच्या कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरूच

Mr. Vasudev Gaiyonde press कॉन्फरन्स