समाजसेविका हर्षल गणपत लाड प्रेस कॉन्फरन्स
म्हाडामध्ये करोडो चा भ्रष्टाचार होत असल्याचा सामाजिक कार्यकर्त्या हर्षला लाड यांचा आरोप मुंबई : प्रतिनिधी म्हाडा कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत समाजसेविका हर्षला गणपत लाड यांनी केला आहे. सामाजिक कार्यकर्त्या हर्षला गणपत लाड यांच्या म्हणण्यानुसार गेल्या सहा महिन्यापासून 11 कुटुंबीयांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे, यासाठी ते लढा देत असताना त्यांना वरिष्ठ अधिकारी संजीव जयस्वाल, मिलिंद शंभरकर आणि उमेश वाघ हे जनतेची कशी पिळवणूक करतात. याबाबत जिवंत उदाहरण पहायला मिळाले. फाईल हरवलीच्या नावाखाली लोकांची पिळवणूक करून कसे पैसे लुबाडले जातात?, याबाबतची पुरावे त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केले. पात्र नसलेल्या व्यक्तीला वास्तुविशारद म्हणून पात्र दाखवून त्यांच्या मार्फत घोटाळेबाज विकासकाची नियुक्ती करून घेणे तसेच सोलंकी योजनेअंतर्गत लोकांची चालू असलेली फसवणूक खोटे जीआर पुढे करून लोकांची होत असलेली दिशाभूल हे सर्व पुरावे त्यांनी प्रसार माध्यमांसमोर ठेवले. स्वतः पैशांच्या नोटाचा हार घालून उमेश वाघ नावाच्या अधिकाराच्या कॅबिन बाहेर पैसे टाकले व गरिबांची कामे करा असे त्यांनी ठणकावून सांगितले. संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी?, याबाबतचे एक निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे.
Comments
Post a Comment