रचना संसद कॉलेज
रचना संसद कॉलेज तर्फे वार्षिक कला प्रदर्शन सोहळा मुंबई : प्रतिनिधी रचना संसद कॉलेज ऑफ अप्लाईड आर्ट अँड क्राफ्ट येथे 21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2025 वार्षिक कला प्रदर्शन होणार आहे. यावर्षीच्या सोहळ्यात एक विशेष आकर्षण म्हणजे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी आणि उपकुलगुरू डॉ. अजय भामरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. उद्घाटन समारंभ 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:45 वाजता होईल, तसेच मान्यवर विद्यार्थी आणि प्राध्यापकांना मार्गदर्शनपर विचार मांडतील.
प्रदर्शनाचा विशेष ठळक मुद्दा म्हणजे विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेली मेहनत आणि प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाने साकारलेली कलेची उत्कृष्ट निर्मिती. विविध वर्षांच्या विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट्स आणि कलाकृती प्रदर्शनात मांडले जातील, जे कलारसिकांसाठी मोठे आकर्षण ठरणार आहेत.
सर्वांना आग्रहाची विनंती आहे की, या प्रदर्शनाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक करावे आणि त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन कॉलेज प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment