मुंगोशी गाव बातमी
यूपीएससी पास झालेल्या प्रशांत सुरेश भोजने च्या गावाला जाणारा रस्ता खडतर राज्य सरकारचे दुर्लक्ष मुंबई : प्रतिनिधी
देशात स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा होत असताना आजही नागरिकांना पायाभूत नागरी सेवा सुविधा मिळत नाहीत ही शोकांतिका आहे… तर नागरिकांना आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करण्याची नामुष्की ओढवलीय…. यूपीएससी पास झालेल्या प्रशांत सुरेश भोजने यांच्या पेण तालुक्यातील मुंगोशी बौद्धवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची वाट अतिशय खडतर व बिकट झालीय… रस्त्या अभावी येथील ग्रामस्थ, रुग्ण, विद्यार्थी, गर्भवती महिलांचे हाल होत आहेत… विशेषतः महिलांनी हा लढा उभारल्याने हे आंदोलन लक्षवेधी ठरले आहे… ग्रामस्थांनी प्रशासन दरबारी खेटे मारून चपला झीजवून ही डोळ्यावर पट्टी बांधून कुंभकर्ण झोपेत असलेल्या अधिकाऱ्यांना जनतेच्या वेदना जाणवत नसल्याने रिपब्लिकन सेना आक्रमक झालीय… लवकरात लवकर येथील जनतेला सुसज्ज व सुरक्षित प्रवासासाठी दर्जेदार रस्ता मिळावा अशी मागणी रिपब्लिकन सेना रायगड यांनी केली आहे. या रस्त्यासाठी रिपब्लिकन सेनेच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष आश्विनी ठाकूर यांनी २० फेब्रुवारी २०२५ पासून पेण तहसील कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केले आहे.रिपब्लिकन सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष अमित गायकवाड व महासचिव वैभव केदारी यांनी पेण तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातील इशाऱ्यानुसार अश्विनी ठाकूर यांनी आंदोलन सुरू केलेय, त्यांच्या या आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळतोय… वेळेत प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अन्यथा भविष्यात मुंबईच्या आझाद मैदानात देखील या विरोधात उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
Comments
Post a Comment