नांदेड बातमी
मला माझी जमीन परत करा नांदेड येथील रहिवाशी मंगल सूरदास वैष्णव वैरागी यांची सरकारला विनंती मुंबई : वृत्तसेवा नांदेड येथील धर्माबाद तालुक्यातील रत्नाळी गावच्या रहिवाशी सौ मंगल सूरदास वैष्णव वैरागी यांच्या मालकी हक्काची जमीन त्यांना परत करावी अशी मागणी स्वतः मंगल सूरदास वैष्णव बैरागी यांनी केली आहे. माझ्या सासूची सुमारे 700 कोटी रुपये किमतीची सदरची जमीन असून ही जमीन काही हडप केली आहे. माझ्या सासूच्या नावाने आजही या जमिनीवर सातबारा आहे. परंतु संबंधित लोक आम्हाला मारहाण करून पळून लावत आहेत. या प्रकरणात आम्ही कलेक्टर तहसील,एसडीएम, पोलिसात तक्रारी दिल्या. परंतु आमचं कोणीच ऐकत नाही. त्यामुळे या संदर्भात मी मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले आहे. मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री पत्र देण्यात आले आहे. जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी आझाद मैदान सोडणार नाही असे मंगल वैष्णवी यांनी सांगितले.
Comments
Post a Comment