आंबेडकरी आई
आंबेडकरी आई : युगप्रवर्तनाची दाई ---------------------------------- मुंबई : प्रतिनिधी ख्यातनाम विचारवंत प्रा. आशालता कांबळे आणि डॉ. श्यामल गरुड यांनी संपादित केलेला, 42 कर्तबगार मुलींनी त्यांच्या हिकमती आयांबद्दल लिहिलेल्या लेखांचा समावेश असलेला ‘आंबेडकरी आई’ हा अतिशय महत्त्वाचा ग्रंथ उद्या मुंबईत प्रकाशित होतो आहे. आईवर आजवर जगभर विपुल लिहिले गेले आहे. असंख्य ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. ते मोठ्या प्रमाणावर वाचले गेले आहेत आणि सर्वदूर गाजलेही आहेत. ‘आंबेडकरी आई’ हा त्या सगळ्यांहून वेगळा असा ग्रंथ असून मुलांच्या आयुष्यात आईचा सांस्कृतिक रोल कसा आणि किती महत्त्वाचा ठरतो हे त्यात उत्कटतेने अधोरेखित करण्यात आले आहे. या ग्रंथाच्या निर्मितीमागे धगधगती समाजपरिवर्तनकारी आकांक्षा उभी असल्याने केवळ वेगवेगळ्या आयांचे त्यांच्या मुलींनी आईबद्दलच्या मायेपोटी रेखाटलेले शब्दरूप चित्र-चरित्र असे या ग्रंथाचे स्वरूप न राहता त्याला सामाजिक आणि सांस्कृतिक मह...