GST news
१८ टक्के जीएसटी कायम स्वरूपी माफ करण्यासाठी पालिका आयुक्तांना पत्र
मुंबई : प्रतिनिधी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी दादरच्या शिवाजी पार्क येथील मैदानावर लावण्यात येणाऱ्या स्टॉल धारकांना मुंबई महानगर पालिकेतर्फे १८ टक्के जीएसटी लावण्यात येतो. त्यामुळे स्टॉल धारकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे.हा जीएसटी कायम स्वरूपी माफ करण्यात यावा अशा आशयाची मागणी करणारे पत्र मुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष रमेश सोनवणे यांनी केली आहे.
दादर चैत्यभुमी येथे महापरिनिर्वाण दिनी संपुर्ण देशातुन बाबसाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी अनुयायी येतात. शिवाजी पार्क मैदानावर स्टॉल लावण्यात येतात. यात प्रामुख्याने पुस्तके, कॅलेंडर, बिल्ले, मूर्त्या, संविधानाच्या प्रती व इतर वाचनीय साहित्य विक्रीसाठी उपलब्ध असतात. तसेच मोठ्या प्रमाणावर पुस्तकांची विक्री होत असते. त्यातून बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य, जीवन चरित्र, विचार लोकांपर्यंत पोहोचत आहेत. आषाढी एकादशि निमित्त पंढरपुराला जाणा-या वारक-यांना टोल माफ करण्यात आला. तसेच गणेश उत्सवानिमित्त कोकणात जाणा-या भाविकांना टोल माफ करण्यात आला.
मुंबई तील सर्व टोल नाके मुक्त करण्यात आले आहेत. तर मग आंबेडकरी समुदाया सोबत हा दुजाभाव का ? शासनाने हा जीएसटी कायम स्वरूपात माफ करण्यात यावा अशी मागणी करणारे पत्र रमेश सोनवणे यांनी पालिकेकडे केली आहे.
Comments
Post a Comment