सारिका समीर सारंग ' नाटक

मुंबईमध्ये सारिका समीर सारंग '  या नाट्यप्रयोगाच्या आयोजन                         रत्नागिरी :  रवींद्र भोजने                               रिंगणे,  पेडणेकर वाडी येथील श्री हनुमान मंदिर संकलनासाठी मुंबई माटुंगा येथे सारिका समीर सारंग  ' या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील रिंगणे पेडणेकरवाडीतील नावेली नदीच्या काठावर निसर्गाच्या परिसरात बसलेल्या श्री. हनुमान मंदिराच्या पुढील वर्षी 100 वर्षे पूर्ण होत आहेत. चैत्र पौर्णिमेला साजरा होणारा श्री हनुमान जन्मोत्सव आणि त्या निमित्ताने सादर होणारे दर्जेदार नाटक, भजन, कीर्तन,  पालखी,  नृत्य असे कार्यक्रम असलेल्या या यात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व भाविकांना तीनही दिवस महाप्रसादाची सोय असल्याने उभ्या रत्नागिरी जिल्ह्यात या उत्सवाचा नावलौकिक आहे.  शंभर वर्षांपूर्वी पर्यावरणास पूरक असलेल्या पद्धतीने लाकडांचा उपयोग करून बांधलेली सुंदर व हवेशीर वास्तव जीर्ण झाल्याने तिच्या जन्मोतराचे काम हाती घेतले गेले असून दानशूर व्यक्तींकडून देणगी जमा करण्याचे काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 22 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजता यशवंतराव नाट्य मंदिर माटुंगा येथे सारिका समीर सारंग  ' या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.                                 या नाटकाला आपण कुटुंब व मित्रपरिवारासह उपस्थित राहून  निधी संकलनासाठी हातभार लावावा,  अशी विनंती श्री हनुमान मंदिर ट्रस्ट रिंगणे पेडणेकर वाडी तर्फे करण्यात आली आहे.*श्री हनुमान मंदिर ट्रस्ट, रिंगणे*
*पेडणेकरवाडी, मु.पो. रिंगणे, ता.लांजा, जि. रत्नागिरी  415643.*
 
*सदस्यांनी निवडलेले कार्यकारी पदाधिकारी*💐💐💐
अध्यक्ष:  श्री सुनील पुंडलिक पेडणेकर 
उपाध्यक्ष: श्री दिलीप सदाशिव पेडणेकर 
             श्री अनाजी बळीराम आयरे 
सचिव:    श्री सुधाकर जयराम पेडणेकर 
सहसचिव : श्री सुभाष महादेव लाड
                श्री विजय नारायण पेडणेकर 
कोषाध्यक्ष: श्री विलास सखाराम पेडणेकर 
सदस्य:   सौ  रोशनी रमाकांत पेडणेकर 
             श्री विश्वनाथ धोंडू पेडणेकर 
             श्री शिवाजी रामचंद्र पेडणेकर 
             श्री गोविंद आत्माराम पेडणेकर 
             श्री महेंद्र मनोहर पेडणेकर 
             श्री प्रविण पुंडलिक पेडणेकर 
             श्री श्रीकृष्ण जनार्दन पेडणेकर 
              श्री संदीप गजानन पेडणेकर 
              श्री नितीन अनंत पेडणेकर 
              श्री सिद्धेश मंगेश बारे
*निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन अणि शुभेच्छा* 💐💐💐

Comments

Popular posts from this blog

Transport News

मुंबईच्या कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरूच

Mr. Vasudev Gaiyonde press कॉन्फरन्स