मुंबई मराठी पत्रकार संघाचे पुरस्कारासाठी अर्ज पाठवा


मुंबई मराठी पत्रकार संघाच्या प्रतिष्ठेच्या
पुरस्कारांसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात
मुंबई : प्रतिनिधी                                        मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने शनिवार, दि. २१ जून, २०२५ रोजी वर्धापनदिनी देण्यात येणार्‍या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. माध्यमसमूहांनी, संपादकांनी, स्वत: पत्रकारांनी अथवा सहकारी पत्रकारही योग्य उमेदवाराचे नाव या पुरस्कारासाठी सुचवू शकतात. २०२४-२०२५ या वर्षात उल्लेखनीय काम केलेल्या तसेच पुरस्कारास पात्र ठरणार्‍या पत्रकारांची नावे आवश्यक ती कागदपत्रे व कात्रणांसह मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवन, महापालिका मार्ग, आझाद मैदान, मुंबई ४०० ००१ येथील कार्यालयात गुरुवार, दि. ५ जून, २०२५ पर्यंत पाठवावीत, असे आवाहन मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी केले आहे.
पुरस्कारांचा तपशील
१. पद्मश्री यमुनाताई खाडिलकर पुरस्कार, पुरस्काराचे स्वरुप : रु. १०,०००/-, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ, निकष : शोधपत्रकारितेसाठी दिला जाणारा पुरस्कार.
२. कविवर्य प्रा. भालचंद्र खांडेकर स्मृती पुरस्कार, पुरस्काराचे स्वरुप : रु. १०,०००/-, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ, निकष : वृत्तपत्रात काम केलेल्या ज्येष्ठ मुद्रित शोधकास दिला जाणारा पुरस्कार.
३. समतानंद अनंत हरि गद्रे पुरस्कार, पुरस्काराचे स्वरुप : रु. १०,०००/-, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ, निकष : सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रदीर्घ कार्य केल्याबद्दल दिला जाणारा पुरस्कार.
४. अ‍ॅड. अधिक शिरोडकर पुरस्कृत कुकरेजा वृत्तछायाचित्रकार पुरस्कार, पुरस्काराचे स्वरुप : रु. १०,०००/-, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ, निकष : वृत्तछायाचित्रकार म्हणून प्रदीर्घ कामगिरीबद्दल दिला जाणारा पुरस्कार.
५. युगारंभकार सर्वोदयी कार्यकर्ते मधूसूदन सीताराम रावकर स्मृती पुरस्कार, पुरस्काराचे स्वरुप : 
 रु. १०,०००/-, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ, निकष : संपादक/ज्येष्ठ पत्रकार म्हणून प्रदीर्घ कामगिरीबद्दल दिला जाणारा पुरस्कार.
शनिवार, दिनांक २१ जून, २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता होणार्‍या वर्धापन दिन समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
टीप : १) वरील पुरस्कारासाठी संपादक किंवा स्वत: पत्रकार तसेच अन्य सहकारी वर्तमानपत्रातील पत्रकारांची शिफारस करू शकतात. संबंधित माहिती (बातमी, वृत्तांत, लेख इ.) आवश्यक झेरॉक्स प्रतीसह mmps.president@gmail.com ईमेलवर पाठवावी किंवा पत्रकार संघाच्या कार्यालयात ११ ते ७ या वेळेत मुनाफ पटेल अथवा प्रभाकर हंकारे (७०३९००४८५५) यांच्याकडे जमा करावी. 


 


Comments

Popular posts from this blog

Transport News

मुंबईच्या कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरूच

Mr. Vasudev Gaiyonde press कॉन्फरन्स