सारिका समीर सारंग ' नाटक
मुंबईमध्ये सारिका समीर सारंग ' या नाट्यप्रयोगाच्या आयोजन रत्नागिरी : रवींद्र भोजने रिंगणे, पेडणेकर वाडी येथील श्री हनुमान मंदिर संकलनासाठी मुंबई माटुंगा येथे सारिका समीर सारंग ' या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील रिंगणे पेडणेकरवाडीतील नावेली नदीच्या काठावर निसर्गाच्या परिसरात बसलेल्या श्री. हनुमान मंदिराच्या पुढील वर्षी 100 वर्षे पूर्ण होत आहेत. चैत्र पौर्णिमेला साजरा होणारा श्री हनुमान जन्मोत्सव आणि त्या निमित्ताने सादर होणारे दर्जेदार नाटक, भजन, कीर्तन, पालखी, नृत्य असे कार्यक्रम असलेल्या या यात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व भाविकांना तीनही दिवस महाप्रसादाची सोय असल्याने उभ्या रत्नागिरी जिल्ह्यात या उत्सवाचा नावलौकिक आहे. शंभर वर्षांपूर्वी पर्यावरणास पूरक असलेल्या पद्धतीने लाकडांचा उपयोग करून बांधलेली सुंदर व हवेशीर वास्तव...