युवा नेते अरविंद सकट

ती वादग्रस्त निवडणूक रद्द करा - अरविंद सकट यांची मागणी                                            मुंबई  : प्रतिनिधी                                   फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज 
(FWICE) अंधेरी पश्चिम, मुंबई द्वारे दिनांक 1 जून, 2025 रोजी बेकायदेशीर व अनधिकृतपणे घेण्यात येणाऱ्या  ज्युनियर आर्टिस्ट असोसिएशनच्या (JAA) निवडणुकांस ताबडतोब स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेला पत्रकार परिषदेत संघटनेचे  नेते अरविंद सकट यांनी केली. 


जूनियर आर्टिस्ट असोसिएशन (JAA)जोगेश्वरी मुंबई च्या निवडणुका घेण्याविषयीचे फेडरेशन ऑफ वेस्टन इंडिया सिने एम्प्लॉईज ( FWICE ) या संघटनेस  सहाय्यक कामगार आयुक्त मुंबई यांनी कोणतेही निर्देश दिलेले नसताना FWICE ने बळजबरीने, बेकायदेशीर व अनधिकृत पद्धतीने ज्युनिअर आर्टिस्ट असोसिएशनच्या माहितीशिवाय वा त्यांच्यासोबतच्या बैठकी शिवाय दिनांक 17 मे,2025 रोजी च्या पत्रकाद्वारे FWICE ने दिनांक 1 जून 2025 रोजी निवडणुका व निवडणूक प्रक्रियेचे वेळापत्रक घोषित केलेले आहे.
     FWICE  च्या या कृतीवर ज्युनिअर आर्टिस्ट असोसिएशन द्वारे तीव्र  आक्षेप नोंदवल्या नंतरही FWICE
द्वारे बेकायदेशीर व अनधिकृतपणे निवडणुक प्रकियेचे  जाहीर केलेल्या वेळापत्रकनुसार 22 मे 2025 रोजी नामांकन अर्ज भरण्या पासून सुरू होणारी प्रक्रिया 1 जून 2025 रोजी निवडणूक घेण्यात येऊन दि.2 जून 2025 रोजी मतमोजणी व निवडणूक निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. तरी वेळापत्रक तातडीने माघारी घेण्यात येऊन निवडणूक प्रक्रिया रद्द वा स्थगित करावीअशी आमची मुख्य मागणी आहे. कारण FWICE चे हे कृत्य बेकायदेशीर  असून लोकशाहीचा गळा घोटणारे व ज्युनिअर आर्टीस्ट असोसिएशन या संघटनेच्या कामकाजात बेकायदेशीरपणे हस्तक्षेप करणारेआहे.
        सहायक कामगार आयुक्तांनी FWICE यांना सध्याची व्यवस्थापकीय समिती बरखास्त करण्या विषयीचे निर्देश दिलेले आहेत. त्याचबरोबर ज्युनिअर आर्टिस्ट असोसिएशनच्या सुधारित घटनेनुसार तीन वर्षांच्या कालावधीसाठी निवडणुका घेण्याची आणि त्यानंतर निवडणुका घेण्याची तसेच निवडणुकीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.
           ज्युनिअर आर्टिस्ट असोसिएशने सहाय्यक कामगार आयुक्त यांनी दिलेल्या दिनांक 9 मे 2025 
रोजीच्या पत्र क्र.17 / 421 नुसार दिनांक 31 मे 2025 रोजी बैठकीचे मुख्य विषय (अजेंडा) ठरवून  बोलावली आहे. बैठकीद्वारे निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या छाननी समितीची नियुक्ती करून निवडणूक सूचना जारी करून पार पाडणार आहेत.  जुनिअर आर्टिस्ट असोसिएशन यांनी सहाय्यक कामगार आयुक्त यांना दिनांक 1 जून 2025 रोजी FWICE फेडरेशनच्या द्वारे ज्युनिअर आर्टिस्ट असोसिएशनच्या बेकायदेशीर आणि अनधिकृत पणे घेतल्या जाणाऱ्या निवडणुका थांबवण्यासाठी आवाहन करण्यात आलेले आहे.
      सहाय्यक कामगार आयुक्त यांनी FWICE ला दिनांक 22 मे 2025 रोजीच्या पत्राद्वारे दिलेल्या निर्देशानंतर  FWICE ने जनरल कौन्सिलची बैठक बोलावली आणि दिनांक 1 जून 2025 रोजी ज्युनिअर आर्टिस्ट असोसिएशनची बैठक पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे
तो पूर्णपणे चुकीचा आहे FWICE चे कर्मचारी, सहकारी व व्यवस्थापन व्यवस्थापन समिती सदस्य आणि इतरांनी ज्युनिअर आर्टीस्टअसोसिएशनच्या विरोधात बेकायदेशीरपणे प्रतिनिधित्व केले आहे. FWICE द्वारे
मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करण्यात आलेले आहेत अशी आमची खात्रीशीर व पुराव्यानिशी माहिती आहे.  इतकेच नव्हे तर ज्युनिअर आर्टिस्ट असोसिएशनच्या सदस्यत्वाच्या नावाखाली आणि निवडणूक नामांकन फॉर्म याद्वारे देखील मोठ्या प्रमाणात पावत्या देऊन पैसे गोळा केले आहेत. हे कृत्य म्हणजे ज्युनिअर आर्टिस्ट असोसिएशनच्या विरोधात कट रचण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे तयार करणे असेच आहे.  तसेच FWICE ने ज्युनियर आर्टिस्ट असोसिएशनच्या अनेक सदस्यांना दिनांक 1 जून 2025 रोजीच्या बेकायदेशीर व अनधिकृत पणे होणाऱ्या निवडणुकीत भाग घेण्यासाठी आणि निवडणुकीत उपस्थित राहण्यासाठी धमक्या दिल्या आहेत. ज्युनियर आर्टिस्ट असोसिएशनच्या नावे पैसे गोळा करणे, बनावट कागदपत्रे तयार करून FWICE कडे देणगी देणे अशा प्रकारच्या कृती करणे हे BNS च्या कलम 318, 319 व 335 अन्वये स्पष्ट पणे गुन्हा आहे FWICE ची ही बेकायदेशीर कृती जूनियर आर्टिस्ट असोसिएशन आणि त्यांच्या सदस्यांवर बंधनकारक राहणार नाही. अशा स्थितीत ज्युनिअर आर्टिस्ट असोसिएशन द्वारे FWICE ला आम्ही आवाहन करीत आहोत की, दिनांक 1 जून, 2025 रोजी आपण जाहीर केलेल्या बेकायदेशीर व अनधिकृत निवडणुका सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या निर्देशांचा भंग करणाऱ्या असल्याने तात्काळ रद्द करण्यात याव्यात किंवा थांबवण्यात याव्यात.
कळावे. अन्यथा आम्ही कायदेशीर कारवाई करू, असे संघटनेचे सल्लागार व कामगार नेते एडवोकेट  यशवंत गंगावणे यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

Transport News

मुंबईच्या कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरूच

Mr. Vasudev Gaiyonde press कॉन्फरन्स