डॉक्टर प्रशांत गंगावणे
भांडुप मध्ये महिला वकिलाचे कार्यालयावर पालिकेचा हातोडा, कारवाई चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप मुंबई : प्रतिनिधी भांडुप विभागातील क्रांतीनगर भांडुप पूर्व या ठिकाणी डॉक्टर प्रशांत ज्ञानेश्वर गंगावणे यांच्या पत्नीचे वकिली व्यवसायाचे कार्यालय पालिकेने कुठल्याही प्रकारची नोटीस न देता कारवाई केली आहे सदरची कारवाही जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा आरोप डॉक्टर प्रशांत गंगावणे यांनी केला आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की काशिनाथ कोपरकर कॉलनी क्रांतीनगर 90 फूट रोड अमेय सोसायटी समोर भांडुप पूर्व या ठिकाणी गंगावणे यांच्या पत्नीचे व किती व्यवसायाचे कार्यालय होते सदरचे कार्यालय बेकायदेशीर असल्याचे सांगत पालिका प्रशासनाने 19 मे रोजी दुपारी दीड वाजता बुलडोझर चा वापर करून तोडण्यात आले. माझ्या पत्नीचे मणक्याचे शस्त्रक्रिया झाली असून त्यांना स्वतंत्र चालता येत नसल्याने त्यांना कायमचे अपंगत्व आले आहे उपरोक्त कार्यालय हे माझ्या पत्नीची वकिली व्यवसायाची आमच्या कुटुंबीयांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन होते कारवाई करताना आम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस पालिका प्रशासनाने दिली नाही. त्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. विशेष म्हणजे मी लोकसभा विधानसभा आणि मुंबई महानगरपालिका या निवडणुकीत वेळोवेळी उमेदवार असल्याने जाणीवपूर्वक माझ्या कार्यालयावर कारवाई करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment