डी. एन. नगर पोलीस केस
डी एन नगर येथील बलात्कार पीडिता न्यायाच्या प्रतीक्षेत मुंबई : प्रतिनिधी उपनगरातील अंधेरी डी एन नगर या ठिकाणी तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करीत शनिवारी संबंधित पीडिता च्या आईने मुंबई मराठी पत्रकार संघ या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली होती. मुंबई मधील D.N. नगर पोलिस ठाणे मध्ये नोंद गुन्हा क्रमांक गुन्हा क्र १३०९/२४ या गँग रेप मधील आरोपी आकाश संधी बिंदू याला पोलिसांच्या तपासातील अभावामुळे जमीन मिळाला आहे त्यामध्ये पोलिस व्यवस्थित तपास करत नसल्याने पीडितेला न्याय मिळत नाही, यासाठी आत्तापर्यंत झालेल्या गँग रेप आणि त्यासंदर्भात पोलिसांचा तपासात होत असलेला हलगर्जीपना हे जनतेपुढे मांडण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
माझे अशिल मुलीवर ज्यांच्या दिनांक ०८ डिसेंबर २०२४ रोजी मुंबई मध्ये गँग रेप झाला .यातील पीडित हिला मुंबई मध्ये चांगली नोकरी मिळाल्याने ती तिच्या मित्र नाव आरोपी मुस्तफा रंगूनवाला ज्याला ती प्रेमाने "भाऊ" म्हणत असे त्यांच्यासोबत तिच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी मुंबईमध्ये फिरत असताना मुस्तफा रंगूनवाला यांनी त्याची टोपी आरोपी आकाश बिंदू याच्या घरी राहिली आहे ती आणण्याच्या बहाण्याने आकाश बिंदू राहत असलेल्या साई कृष्ण अपार्टमेंट ,D.N. नगर,अंधेरी (प) याठिकाणी भाड्याच्या घरी घेऊन गेला.तिथे गेल्यानंतर आरोपी मुस्तफा रंगूनवाला याचा मित्र आरोपी आकाश बिंदू आणि मोहिम खान यांनी तिला अंमली पदार्थां डोके दुखीची औषध आहे असे सांगून शीत पेय मध्ये मिक्स करून त्या तीन आरोपींनी सामूहिक बलात्कार केला ,असे ॲड.जतीन आढाव यांनी सांगितले.
सदर घटनेबाबत पीडितेच्या नातेवाईकाना पीडित मुलीने सांगितल्यावर पीडितेची नातेवाईक यांनी ०९ डिसेंबर २०२४ तात्काळ आरोपी विरुद्ध तक्रार नोंदविण्यासाठी मुंबई मधील ओशिवरा पोलीस ठाणे येथे गेले असता त्यांनी घटनास्थळ त्यांच्या हद्दीत नसल्याचे सांगून त्यांनी DN नगर पोलिस ठाण्यास पाठवले,तेथेही गुन्हा नोंद करण्यास नकार देत होते,परंतु वरिष्ठ अधिकाऱ्याने जेव्हा त्यांना हा विषय गांभीर असल्याचे सांगून गुन्हा क्र १३०९/२४ अन्वये गुन्हा नोंद करून घेतला.खरं तर पोलिसांनी तो गुन्हा 00 ने नोंद करून पुढे पाठवायला पाहिजे होता.जे त्यांनी केलं नाही परंतु पीडितेच्या नातेवाईकांनी आपली अब्रू जाऊ नये म्हणून काही कोणाला न सांगता पोलिसाने सांगितल्याप्रमाणे पाठपुरावा करत होत्या.
इतके करूनही डी.एन. नगर पोलिसांनी या केस चा तपास व्यवस्थित केला नाही ,कारण ज्यादिवशी FIR घेतला तेव्हा पोलिसांनी पीडितांच्या नातेवाईकांना सांगितले की,आपल्या मुलीचा रेप झाला तेव्हा आरोपींनी आपल्या मुलीचा नग्न अवस्थेतील फोटो काढला आहे तिला ब्लॅकमेल करण्यासाठी परंतु चारशीट मध्ये ही बाब त्यांनी नमूद केली नाही,याबाबत त्यांना विचारणा केली तर त्यांनी सांगितले की त्यांनी आरोपीचा मोबाईल लॅब मध्ये पाठवला आहे ,त्याचा रिपोर्ट आल्यानंतर आम्ही पुरवणी मध्ये नोंद घेऊ असे सांगून पीडित मुलीच्या कुटुंबीयांची दिशाभूल केली.आणि पोलिसांच्या या अशा अनेक चुकीमुळे या केस मधील एक आरोपी मोहसीन खान या घटनेच्या दुसऱ्या दिवशी पासून फरार आहे जी अद्याप मिळून आला नाही,विशेष म्हणजे फरारी आरोपी मोहसीन खान यांच्या भुसावळ येथील राहत्या घरी तपासला देखील गेले नाहीत.यामध्ये आम्हाला D N नगर पोलिसांचे आरोपीला फरार करण्यामागे हाथ आहे असे वाटते .
यामधील एक आरोपी मुस्तफा रंगूनवाला हा आर्थर रोड मध्ये अटक आहे.परंतु तिसरा आरोपी आकाश संधी बिंदू याला देखील २४ फेब्रुवारी २०२५ रोजी पीडितेच्या खाजगी भागावर नवीन जखमा आढळल्या नाहीत आणि आरोपी आकाश याचे लग्न होणार आहे हे लक्षात घेऊन जमीन मंजूर केला होता,परंतु आम्हाला असे नमूद करावेसे वाटते की,पीडितेला या तिन्ही आरोपी मोहसीन खान यांनी मारहाण केली जो फरार आहे, मुस्तफा रंगूनवाला हा मुख्य आरोपी जो सध्या आर्थर रोड कारागृहात बंद आहे,यांच्याकडून करण्यात आलेल्या पीडितेच्या असलेल्या कपाळावर आणि मानेवरील जखमा दिसत होत्या आणि त्याची वैद्यकीय अहवालात पुष्टी झाली होती.हे आदरपूर्वक निदर्शनास आणले पाहिजे की पीडितेच्या वर झालेले आघात, विशेषत:जेथे पीडितांना ड्रग्स दिले जाते आणि अक्षम केले जाते, ते सहसा अदृश्य राहतात असे ॲड. जतीन आढाव यांनी सांगितले.
खाजगी भागावरील ताज्या जखमांद्वारे नेहमी वैद्यकीयदृष्ट्या दस्तऐवजीकरण केले जाऊ शकत नाही अशा अदृश्य चट्टे सोडतात, खाजगी भागावर दृश्यमान जखमांची अनुपस्थिती संमतीने कधीही समतुल्य केली जाऊ नये, तसेच या प्रकरणातील सह आरोपींपैकी एक आरोपी आजपर्यंत फरार आहे. ज्यामुळे सार्वजनिक सुरक्षेबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे आणि अशा मध्ये आरोपीस जमीन मंजूर झाल्याने समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो त्यामुळे हा जमीन रद्द व्हावा असा पोलिसांनी PP किंवा न्यायालयाला अर्ज केला नाही असे ॲड. जतीन आढाव यांनी सांगितले.
जामीन आदेश पारित होऊन दोन महिने उलटूनही महाराष्ट्र राज्य आणि मुंबई पोलीस जामीन रद्द करण्याची विनंती न्यायालयापर्यंत करण्यास अपयशी ठरले आहेत. पीडितेला मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या जगण्यासाठी संघर्ष करत असताना खाजगी वकिलांना एकटीने भार सहन करावा लागत आहे.जर एखाद्या सुशिक्षित, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र वाचलेल्या व्यक्तीची ही दुर्दशा असेल,तर खाणकाम करणाऱ्या अशिक्षित किंवा वंचित बलात्कार पीडितांच्या नशिबी कल्पनाच करता येईल. वेदनादायक वास्तव हे आहे की अनेक बळी, विशेषत: गरीब कुटुंबातील, कायदेशीर उपायांचा पाठपुरावा करण्यासाठी संसाधने देखील नसतात असे श्री जतीन आढाव यांनी सांगितले.
अशा मुंबई मध्ये अनेक केसेस आहेत ,ज्यामध्ये पोलिसांनी व्यवस्थित तपास न केल्याने पीडितेला न्याय मिळत नाही.ज्याची माहिती घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि पीपल्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट जतीन आढाव यांनी दाखल केलेल्या आरटीआयने मुंबईतील बलात्काराच्या घटनांमध्ये पोलिसांच्या निष्क्रियतेबद्दल चिंताजनक आकडेवारी उघड केली ,ज्यामध्ये 2023 मध्ये बलात्काराच्या 977 एफआयआर नोंदवण्यात आल्या, मात्र 603 आरोपींना अटक करण्यात आली - 374 आरोपी अजूनही फरार आहेत.2024 मध्ये, 1,050 एफआयआर नोंदवण्यात आले, 1,038 आरोपींना अटक करण्यात आली - 12 आरोपी अद्याप फरार आहेत.2025 च्या पहिल्या दोन महिन्यांत 82 बलात्काराचे गुन्हे दाखल झाले, मात्र केवळ 62 आरोपींना अटक - 20 यामध्ये फरार गुन्हेगारांची खरी संख्या लक्षणीय असल्याचे जतीन आढाव यांनी सांगितले,तसेच यामधील महत्वाच्या घटना म्हणजे पुणे बस स्थानक बलात्कार प्रकरणः स्वारगेट तसेच जोगेश्वरी येथे १७ वर्षीय मुलीवर अत्याचार झाला यादेखील आहेत.
लंडनच्या स्कॉटलंड यार्डच्या तुलनेत एकेकाळी आपल्या पोलिस दलाचा अभिमान असलेल्या शहराला आता एका भीषण वास्तवाचा सामना करावा लागतो जिथे बलात्काराचे शेकडो आरोपी कठोर पाठलाग न करता मोकळे फिरत असतात.त्यामुळे आमची केसमध्ये पोलिसांच्या हलगर्जी पणामुळे आरोपीला जमीन मिळाला आहे.त्यामुळे या अशा केस मध्ये मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी हस्तक्षेप करून तपासाला वाव दिला पाहिजे.
जतीन आढाव यांनी सांगितले की,आमच्या केस मधील पीडित मुलीच्या कुटुंबीयांची अशी विनंती आहे की, बॉम्बे उच्च न्यायालयाने स्वयंप्रेरणेने (सु.मोटो) दाखल घ्यावी,राज्यसरकारने त्वरित जमीन रद्द अर्ज दाखल करावा,पोलिसांच्या तपासातील फरार आरोपीवरील कारवाईतील उणीवा तपासण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी सुरू करावी, बलात्कार प्रकरणांसाठी विशेष फास्ट रॅक कोर्ट स्थापन करावी तसेच पोलीस व न्याय यंत्रणेसाठी लैंगिक अत्याचार प्रकरणात संवेदनशीलता बाळगण्यात यावी यासाठी तरतूद करावी.
Comments
Post a Comment