सायबर युगातील व्यवसाय सुरक्षितेवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन

सायबर युगातील व्यवसाय सुरक्षिततेवर एल.एल.आय.एम., मुंबई येथे व्यवस्थापन विकास कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई – प्रतिनिधी                                        ११ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता, लाला लजपत राय इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (LLIM), महालक्ष्मी, मुंबई येथे "व्यवसाय सुरक्षितता सायबर युगात: सायबर धोके व्यवस्थापन व डेटा संरक्षण कायदे" या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर व्यवस्थापन विकास कार्यक्रम (Management Development Program - MDP) आयोजित करण्यात येत आहे.

हा कार्यक्रम मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (MSDLSA) यांच्या सहकार्याने घेतला जात असून यामध्ये विविध औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञ, सायबर सुरक्षा विश्लेषक, कायदेतज्ज्ञ, आणि CSR क्षेत्रातील नेते सहभागी होणार आहेत.

कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. सतीश हिवाळे यांच्या हस्ते होणार असून, विविध विषयांवरील सत्रांमध्ये मान्यवर वक्ते मार्गदर्शन करणार आहेत:

प्रो. नीता खोब्रागडे (प्रमुख, डिजिटल व सायबर फॉरेन्सिक विभाग, सरकारी विज्ञान संस्था, मुंबई)

श्री. शुभम सावंत (सायबर सुरक्षा तज्ज्ञ, VAPT आणि Certified Ethical Hacker)

डॉ. मोहिनी सुर्यवंशी (संस्थापक, पेटंट व ट्रेडमार्क ॲटर्नी, Intellex Empire, पुणे)

श्री. सचिन रल्हान आणि प्रा. हेमंत सुधाकर सामंत (CSR व NGO क्षेत्रातील मान्यवर)


कार्यक्रमात सायबर सुरक्षेच्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर, डेटा प्रोटेक्शन कायद्यांची अंमलबजावणी, CSR व निधी संधी, आणि व्यवसायिक धोका व्यवस्थापन यावर सखोल चर्चा होणार आहे. सहभागींसाठी नोंदणी शुल्क नाही व सर्व सहभागीना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

कार्यक्रमाचे मुख्य संरक्षक (Chief Patron) म्हणून डॉ. कमल गुप्ता (अध्यक्ष, LLIM) यांची भूमिका असून, पेट्रन्स म्हणून श्री. राजीव गुप्ता (मुख्य कार्यकारी अधिकारी), डॉ. एच. जे. भसीन (संचालक), डॉ. आशा अग्रवाल (विद्यार्थी समुपदेशक), व डॉ. सुरेश सुर्वणा (प्रमुख, HR विभाग) यांचा सक्रिय सहभाग आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख समन्वयक व संयोजक डॉ. केवल उके (सहयोगी प्राध्यापक, एल.एल.आय.एम.) आहेत.


Comments

Popular posts from this blog

Transport News

मुंबईच्या कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरूच

Mr. Vasudev Gaiyonde press कॉन्फरन्स