MESTA news

राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा आरटीई शुल्क परतावा त्वरित परत करा, मेस्ता संघटनेची मागणी                                                  मुंबई : प्रतिनिधी                                 राज्यातील सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा थकीत आर टी ई शुल्क त्वरित परत करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र इंग्रजी स्कूलस ट्रस्टी असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रो. डॉ. नामदेव दळवी यांनी गुरुवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत केली.                                                         राज्यातील सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा आर टी ई परतावा त्वरित देण्यात यावा. अनधिकृत शाळांवर गुन्हे दाखल करण्यात यावे.नवीन इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या मान्यतेसाठी व दर्जा वाढीसाठीचे निकष शिथिल करण्यात यावेत. राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांना शासनाच्या मार्फत प्रशिक्षण देण्यात यावे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांना लोकप्रतिनिधीचा निधी वितरित करण्यासाठी शासनाने मान्यता द्यावी.                            राज्यातील इंग्रजी माध्यमातील शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना शासनातर्फे शालेय गणवेश पाठ्यपुस्तके व शालेय पोषण आहार योजना कार्यान्वित करण्यात याव्यात. राज्यभरात 34 हजार इंग्लिश शाळा,  आहेत. त्यापैकी 4 हजार शाळा बोगस आहेत.  सदर बोगस शाळांवर त्वरित कारवाई करण्यात यावी यासाठी लवकरच मुंबईच्या आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे तसेच ठाणे जिल्ह्यात संघटनेच्या वतीने एक अधिवेशन देखील भरवण्यात येणार असल्याचे दळवी यांनी सांगितले.                                                 सदरच्या पत्रकार परिषदेमध्ये संघटनेचे महासचिव डॉ. विनोद कुलकर्णी, विधी सल्लागार एड. सुधीर महाले,  महाराष्ट्र प्रदेश सचिव सुनील पालवे, ठाणे जिल्हा अध्यक्ष नरेश पवार, ठाणे जिल्हा सचिव नरेश कोंडा आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

Transport News

मुंबईच्या कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरूच

Mr. Vasudev Gaiyonde press कॉन्फरन्स