Vinay koreji news
वीरशैव लिंगायत समाजाचे नेते व जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष डॅा. विनय कोरे (सावकर) यांच्या पक्षाच्या मुंबई येथील मेळाव्यात महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व प्रवक्ते डॅा. विजय जंगम( स्वामी) यांनी भेट घेऊन आगामी विधानसभा निवडणूकीसाठी जनसुराज्य पक्षाच्या ७ उमेदवारांना शुभेच्छा दिल्या तसेच अखिल वीरशैव लिंगायत महासंघातर्फे जाहीर पाठींबा दिला. यावेळी डॅा. विनय कोरे (सावकर) व डॅा. विजय जंगम(स्वामी) यांच्यात सविस्तर चर्चा झाली व पुढील राजकीय समीकरणासाठी निवडणूक निकालानंतर महासंघाची व जनसुराज्य पक्षाची नेमकी भूमिका काय असावी याबाबत दि. २३ नंतर मुंबई किंवा कोल्हापूर येथे बैठक घेण्याचे ठरविले आहे.
Comments
Post a Comment