लोढा news
लोढा स्प्लेंडोरा गृहसंकूलातील रहिवाश्यांची सर्वपक्षीय उमेदवारांना विनंती!
लेखी आश्वासन द्या अन्यथा मतदानावर बहिष्कार !
ठाणे- प्रतिनिधी
मूलभूत सुविधांचे लेखी आश्वासन द्या, अन्यथा मतदानावर बहिष्कार किंवा नोटाचा पर्याय निवडणार.
घोडबंदर रोड येथील स्पेलंडोरा गृहसंकूलातील सदस्यांचा निर्धार
ठाणे - करदाते म्हणून किमान मूलभूत सुविधांची आवशक्यता घोडबंदर रोड येथील स्पेलंडोरा गृहसंकुलातील राज्यातल्या प्रमुख राजकीय पक्षाच्या विधानसभेच्या उमेदवारांकडून व्यक्त केली आहे. टँकरमुक्त सुरळीत पाणीपुरवठा, वाहतूक कोंडीमुक्त प्रवास आणि अखंडित वीज पुरवठा इत्यादी मागण्यांची पुर्तता करण्याचे जो लेखी आश्वासन देईल त्यांना मताचे दान दिले जाईल. तसे आश्वासन कोणत्याही उमेदवाराने न दिल्यास नाईलाजाने नोटाचा पर्याय स्विकारणार असल्याची माहिती स्पेलंडोरा फेडरेशनचे चेअरमन डॉ. विजय जंगम स्वामी यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली.
मंगळवार 5 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी स्पेलंडोरा सोसायटीच्या अॅम्फीथिएटर परिसरात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात एकूण ८ सोसायटीच्या प्रतिनिधींनी आपली जाहीर भूमिका मांडली. यावेळी फेडरेशनचे कार्यवाह मुकेश दुग्गल, खजिनदार निरंजन पांडा आणि इतर सर्व सोसायटीतील प्रतिनिधी प्रा. मदन दुबे, सोनलकुमार वर्मा, प्रफुल ढोलकीया, रोहन पाटील, तरुण कुमार, हिरेन जोशी, विरेंद्र आर्या,
सौ. प्रिया अगरवाल, सौ. रिता देशपांडे व इतर सर्व रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घोडबंदर रोड येथील आम्हा रहिवाशांना पाण्याची तिव्र टंचाई भासत आहे. टँकरने सोसायटीला नियमित पाणीपुरवठा करावा लागतो. टँकरचे बिल भरून सोसायटी मेटाकुटीला आली आहे. नियमित आणि स्वच्छ पाणी पुरवठा जलवाहिनीद्वारे व्हावा अशी आमची आग्रही मागणी आहे.
घोडबंदर रोडवर दररोज वाहतूक कोंडी हॊते. यामुळे रहिवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सुरळीत रहदारीसाठी ब्लूप्रिंटसह वचनबद्धता आणि अंतिम तोडगा हवा आहे. महावितरण वीज पुरवठ्याची समस्या जाणवत असून अखंडित वीज पुरवठा व्हावा, अशी आमची मागणी आहे. कन्हेन्स आणि सर्व सोसायट्यांचे फेडरेशनकडे हस्तांतरण, ठाणे महापालिकेकडून मोफत कचरा संकलन, अशा आमच्या प्रमुख मागण्या असल्याचे डॉ. विजय जंगम स्वामी व प्रा. मदन दुबे यांनी सांगितले.
Comments
Post a Comment