देवेंद्र फडणवीस news
दलित पँथर च्या वतीने देवेंद्र फडणवीस यांचा महाविजयाबद्दल सत्कार व येत्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या महायुतीस निवडून आणण्याचा निर्धार....
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभा 2024 मध्ये महायुती समन्वयक मा.श्री. प्रसादजी लाड साहेब व माजी खा.राहुल शेवाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महत्वाची भूमिका बजावत महायुतीतील उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी पार पाडत दलित पँथरच्या राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी महत्वाची कामगिरी बजावत महायुतीतील उमेदवारांना निवडून आणण्यात दलित पँथर सामाजिक संघटनेचा मोलाची कामगिरी बजावली आहे.
राज्यातील व देशातील दलित समाजाच्या हिताचे अनेक निर्णय भाजपा महायुतीच्या सरकारने घेतले आहेत. त्यात महत्वाचे की,मध्यप्रदेश मधील महू येथे 11 कोटी रुपये खर्च करून डॉ. आंबेडकराचे जन्मस्थळाचा विकास, दादर येथील इंदू मिलची 13 एकर जागा व त्यासाठी 1100 कोटी रुपयाच्या भव्य स्मारकची निर्मिती ज्यांचे 60% काम पूर्ण झाले आहे, अनुसूचित जातीच्या 27 हजार उद्योजकांना स्टँडअप योजनेअंतर्गत 5600 कोटीचे सवालतीच्या दरातील कर्ज,
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) च्या माध्यमातून सर्वाना फेलोशिप व विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी मोफत प्रशिक्षण, परदेश शिक्षणासाठी फेलोशिप अश्या अनेक योजना सुरु करून दलित समाजास न्याय देण्याचे काम केल्याचे भाजपा महायुतीच्या सरकारने केल्याचे प्रचारात लोकांना सांगून दलित समाजाने यापुढे महायुती सरकारच्या मागे उभे राहण्याचे सांगितल्याने दलित समाजात सुद्धा महायुतीच्या उमेदवाराच्या प्रति सहानुभूती निर्माण झाल्याने महायुतीची सुनामी आल्याचे दलित पँथर चे प्रदेश अध्यक्ष डॉ. घनश्याम भोसले यांनी सांगितले.
येणाऱ्या काळातील महानगर पालिका,जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावून महायुतीस निवडून आणण्याचा निर्धार केल्याचे सत्कारा वेळी देवेंद्र फडणवीस साहेबांना दलित पँथर च्या राष्ट्रीय अध्यक्ष श्री. बाळासाहेब पडवळ यांनी सांगितले .
आज दलित पँथर सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा बाळासाहेब पडवळ यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र प्रदेश संघटक श्री.गोपाल पवार, मुंबई प्रदेश अध्यक्ष रोहित भंडारे,पंकज खरे रायगड जिल्हा उपाध्यक्ष व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment