इकोफ्रिडली news

तरुण उमेदवारांना निवडून द्या श्री अशोक यांचे सर  यांचे आवाहन                                                             मुंबई :  रविंद्र भोजने                                              सध्या राज्यात सुरू असलेल्या महाराष्ट्र विधानसभा लोकशाही उत्सवामध्ये यंदा तरुण उमेदवारांना मते देऊन त्यांना विजयी करा, असे आवाहन इको फ्रेंडली लाईफ संस्थेचे संस्थापक प्रमुख श्री अशोक यांचे सर यांनी बुधवारी प्रेस क्लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले.              5 जून 2024 या जागतिक पर्यावरण दिनापासून पुढील 4 वर्षात इको फ्रेंडली लाईफ फाउंडेशन देशभरात 700 कोटी फळझाडे लावण्याचा निर्धार केला आहे.  या महा उपक्रमांतर्गत महाराष्ट्र सह देशातील विविध ठिकाणी वृक्षारोपण होत आहे. या मोहिमेत विशेष करून महाविद्यालयीन तरुण-तरुणी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.  मात्र राज्यकर्त्यांच्या उदासीन भूमिकेमुळे या उपक्रमाला गती मिळत नाही तेव्हा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पर्यावरण पूरक लोकप्रतिनिधी असणे अत्यंत आवश्यक आहे. हे काम फक्त युवाशक्तीच करू शकते,  प्रामुख्याने युवा वर्गाला प्रस्तावित करण्यासाठी विधानसभा 2024 च्या निवडणुकीत केवळ तरुण उमेदवारांना मते देऊन त्यांना विजयी करण्यासाठी महाराष्ट्र विधानसभा लोकशाही उत्सव 2024 तरुण तगडा भारत या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे,  अशी माहिती अशोक सर यांनी दिली.       सर्वच म्हणतात आम्ही निवडणूक लढतो लढाई फक्त एकमेकाचं बळकवण्यासाठी लुटण्यासाठी असते.  तेव्हा आता थांबवा हो गोरगरिबांची देशाची लूट आता नाही देणार यांना सूट विधानसभा आनंद उत्सवात चला करू महाराष्ट्राच्या विकासाच्या विचारांची लयलुट हा विचारांमार्फत तरुण-तरुणींमध्ये राजकारणाबाबत जागृती निर्माण व्हावी आणि या देशात पर्यावरण संरक्षण करणारे शासन निर्माण व्हावे याकरिता तरुण तगडा भारत अभियान च्या वतीने विधानसभा निवडणूक 2024 मध्ये अधिकाधिक युवा उमेदवारांना निवडून देण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.  जगात सर्वात जास्त तरुणांची संख्या भारतात तरीही तरुणांचे नेतृत्व देशात नाही या परिस्थितीला बदलण्यासाठी महाराष्ट्रासह देशांमध्ये तरुणांचे नेतृत्व पुढे यावे यासाठी तरुणांमध्ये जागृती येणे आवश्यक आहे यासाठी ठिकठिकाणी मार्गदर्शन शिबिर देखील राबवले जात आहेत असे अशोक  सर यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

Transport News

मुंबईच्या कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरूच

Mr. Vasudev Gaiyonde press कॉन्फरन्स