भाई news
भालचंद्र रघुनाथ चव्हाण यांचे निधन मुंबई : प्रतिनिधी गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भालचंद्र उर्फ भाई चव्हाण यांचे गुरुवारी रात्री अल्पशा आजाराने राहत्या दादर या ठिकाणी निधन झाले. त्यांच्यावर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. भालचंद्र चव्हाण यांनी अनेक वर्ष पाट पन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भूषविले होते. आपल्या कार्यकाळात संस्थेच्या शैक्षणिक कार्यकाळात मोठा हातभार लावला होता. त्यांच्यात नेतृत्वात राज्यस्तरीय मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येत होते. ते पाटपन्हाळे येथील मूळ रहिवासी असून मुंबई स्थायिक झाले होते. त्याचप्रमाणे भालचंद्र रघुनाथ चव्हाण हे श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ ट्रस्ट मुंबई व श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह नियामक मंडळातील माजी उपाध्यक्ष देखील होते.
Comments
Post a Comment