manse सुवर्णकार news
सुवर्णकारांनी मनसेच्या उमेदवाराला मतदान करावे- नंदकिशोर तळावडेकर यांचे आवाहन मुंबई : प्रतिनिधी राज्यभरातील सुवर्णकार, दुकानदार, कामगार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला मतदान करावे असे आवाहन शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना प्रणित महाराष्ट्र नवनिर्माण सुवर्णकार सेनेचे अध्यक्ष नंदकिशोर धोंडू तळावडेकर यांनी केले आहे. महाराष्ट्रातील सुवर्णकार आणि व्यावसायिक यांना शासनाकडून कला कौशल्य उपलब्ध करून देण्यासाठी कमतरता असल्याने सोनार पिढीचे बरेच नुकसान झाले आहे. ज्वेलरी क्षेत्रात बऱ्याच मोठ्या कंपन्या सक्रिय असून महाराष्ट्रातील नियमावलीप्रमाणे भूमिपुत्रांना प्रशिक्षणासहित हमखास रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. हॉलमार्किंग कायदा वेळेनुसार बदलण्यात येणारी नियमावली अंमलबजावणी करण्यात यावी. जेणेकरून सोनार नावाखाली सुरू असलेली लूट थांबविता येईल. सुवर्णकार कामगार कुशल कारागीर यांना भारत सरकारच्या कामगार प्रवर्गात समाविष्ट करून किमान वेतन व कायदेशीर दिली मिळवून द्यावे. यामध्ये विमा योजना भविष्य निर्वाह निधी याचा समावेश आहे तसेच ज्वेलर्स आणि दुकानदार यांना व्यवहारिक संरक्षण मिळवून देणे आधी मागण्यांसाठी सदरची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना नंदकिशोर तळावडेकर यांनी सांगितले की, सध्या विधानसभेच्या निवडणुका सुरू आहे. यामध्ये मनसेचे उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत त्यामुळे सुवर्णकार व दुकानदारांनी या उमेदवारांना निवडून द्यावे असे तळावडेकर यांनी सांगितले.
Comments
Post a Comment