Manoj Gaikwad
वडाळा मतदार संघात मनोज गायकवाड यांना जनतेचा वाढता पाठिंबा मुंबई : प्रतिनिधी कोरबा मिठागर, आनंद नगर सारख्या मोठ्या झोपडपट्ट्या व जुन्या मोडकळीस झालेल्या इमारती वस्त्यांमधील अस्वच्छता आदी प्रश्न वडाळा मतदारसंघात भेडसावत आहेत. ही निवडणूक याच प्रश्नां भोवती लढली जाणार असून विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर यांच्यासमोर सलग निवडून येण्याचे आवाहन आहे, असे असताना या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी चे लोकप्रिय उमेदवार मनोज गायकवाड यांना जनतेचा वाढता पाठिंबा मिळत आहे. रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी कार्यालयाचे उद्घाटन केलं या प्रसंगी मोठ्या संख्येने विभागातील जनता उपस्थित होते. उद्धव सेनेचे उमेदवार माजी महापौर श्रद्धा जाधव आणि मनसेच्या माजी नगरसेविका स्नेहल जाधव यांचे देखील त्यांच्यासमोर आवाहन आहे वडाळ्यातून कालिदास कोलमकर यांनी 1990 पासून सलग 8 वेळा विजय मिळविला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि भाजपा असा त्यांचा प्रवास राहिला असून या तिन्ही पक्षांच्या चिन्हावर ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. यंदा उद्धव सेना आणि काँग्रेस एकत्र असल्याने त्याचा काहीसा फायदा श्रद्धा जाधव यांनाही होण्याची चिन्हे आहेत या मतदारसंघात जवळपास 13 हजार मराठी मतदार आहेत त्याचबरोबर 42 हजारच्या आसपास गुजराती, राजस्थानी समाज आहे. अल्पसंख्यांक मतदारांची संख्या 28 हजारांच्या आसपास आहे. 18 हजार दलित समाजाची मते आहेत. लोकसभेला अल्पसंख्यांक मतदारांनी उद्धव सेनेच्या अनिल देसाई यांना असाच दिली होती. यावेळी हा मतदार स्वतःकडे खेचण्याच आवाहन अनेकजण करत आहेत. जुन्या इमारतींचा रखडलेला पुनर्विकास स्प्रिंग मिल टाटा मिल कोहिनूर मिलच्या जागांवरील रहिवाशांचा पुनर्विकास आणि कोरबा मिठागर, आनंदनगर आधी झोपडपटांच्या पुनर्विकासाचे प्रश्न प्रलंबित आहेत. वस्त्यांमध्ये रात्री 12 वाजता पाणी येणे, पाण्याचा कमी दाबाने पुरवठा होणे तसेच मतदारसंघात मोठे रुग्णालय नाही. झोपडपट्टी भागात मैदानांचाही अभाव आहे अशा प्रकारच्या या ठिकाणच्या समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी मला जनतेने निवडून द्यावे असे आवाहन मनोज गायकवाड यांनी केले आहे.
Comments
Post a Comment