Dr. vijay jangam( swami )

वीरशैव लिंगायत समाजाची मते निर्णायक ठरली! महायुतीच्या पारड्यात मतांचे दान…. 

मुंबई : प्रतिनिधी                                              अखिल वीरशैव लिंगायत महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॅा. विजय जंगम (स्वामी) यांनी वीरशैव लिंगायत समाजाला केलेल्या विनंतीवजा आवाहनाला समाजाने अभूतपु्र्व प्रतिसाद दिला व महायुतीच्या पारड्यात भरभरून मतांचे दान दिले. याचाच परिणाम आज महायुतीला राज्यात २०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या. तसेच विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळालेल्या वीरशैव लिंगायत समाजातील उमेदवारांनी मोठा विजय मिळवला आहे. 
महाराष्ट्रात वीरशैव लिंगायत यमाजाची साधारण ३.५ कोटी पेक्षा जास्त लोकसंख्या असून ३५ ते ४० विधानसभा मतदार संघात वीरशैव लिंगायत समाजाचे प्राबल्य आहे, हे लक्षात घेता महासंघाचे कार्याध्यक्ष डॅा. विजय जंगम(स्वामी) यांनी विधानसभा निवडणूकीपूर्वीच सर्व राजकीय पक्षांना त्या त्या मतदार संघात समाजाचे उमेदवार देण्याचे आवाहन केले होते. त्या विनंतीला मान देऊन अनेक राजकीय पक्षांनी उमेदवारी दिली व वीरशैव लिंगायत समाजाचे ६ आमदार निवडून आले तर काही उमेदवार फार कमी मतांनी पराभूत झाले. उर्वरीत मतदार संघात मात्र भाजपाचे दिल्ली येथील पक्षश्रेष्ठी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या ठोस आश्वासनानंतर वीरशैव लिंगायत समाज सनातन हिंदू धर्म रक्षणासाठी, राष्ट्रहितासाठी व मानवतेच्या कल्याणासाठी महायुतीच्या पाठीशी ठाम उभा राहीला. काशी पीठाचे जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॅा. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी व वीरशैव लिंगायत समाजाचे सर्व प्रमुख धर्मगुरु यांनी महायुतीच्या सर्व नेत्यांना धर्मरक्षणार्थ आशिर्वाद दिलेत त्यामुळे वीरशैव लिंगायत समाजाची मते किती प्रमाणात निर्णायक ठरू शकतात हे आज सिद्ध झाले.

Comments

Popular posts from this blog

Transport News

मुंबईच्या कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरूच

Mr. Vasudev Gaiyonde press कॉन्फरन्स