Dharavi MLA Baburao Mane
छत्रपती शिवाजी विद्यालय धारावी बस डेपो याच्या शेजारी बालदिन थाटात साजरा मुंबई : प्रतिनिधी धारावी येथील सुप्रसिद्ध छत्रपती शिवाजी विद्यालय येथे बालदिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विभागातील ज्येष्ठ शिवसेना नेते व माजी आमदार बाबुराव माने यांनी उपस्थिती दर्शवून या मुलांना शुभेच्छा दिल्या. आज पंडित नेहरू यांचा जन्मदिवस या निमित्ताने मी या बालकांना शुभेच्छा देतो की, आजच्या आपल्या देशाच्या माजी पंतप्रधानांचा आज जन्मदिवस म्हणजे त्यांच्या जयंतीचा दिवस आहे, त्यानिमित्ताने आपल्या देशभर त्यांचा जन्मदिवस म्हणजे बाल दिवस त्यांचा जन्मदिवस हा बाल दिन म्हणून आपल्या देशभर पाळला जातो आणि त्या निमित्ताने धारावीतील छत्रपती राजे शिवाजी विद्यालय या शाळेतील सर्व विद्यार्थी आज शाळेच्या मैदानात उतरून वेगवेगळ्या प्रकारची खेळ खेळत आनंद साजरा करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकमेकाला आनंद देण्याचा प्रयत्न करत आहेत. या आजच्या बाल दिनाच्या निमित्ताने सर्व माझ्या बालमित्रांना माझ्याकडून मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी देत आहे. मोठ्या संख्येने या ठिकाणी लहान बालके शालेय विद्यार्थी व पालकांनी तसेच शिक्षकांनी उपस्थिती दर्शवली होती.
Comments
Post a Comment