हजरत पुलशाह पीर हजरत पुलशाह पीर दर्ग्यावरील कारवाईचा मुस्लिम समाज बांधवांकडून निषेध मुंबई : प्रतिनिधी १८८५ पासून पनवेलच्या पारगाव येथे अस्तित्वात असलेल्या हजरत पुलशाह पीर दर्ग्यावर सिडको प्रशासनाने बुलडोझर फिरवून तो उध्वस्त केला आहे. त्यामुळे मुस्लिम व दलित समाजामध्ये कमालीचा रोष पसरला आहे.९ डिसेंबर पर्यंत दर्ग्याची पुनर्निर्मिती न केल्यास मुस्लिम समाज व रिपब्लिकन सेनेने कार्यकर्ते १० डिसेंबर पासून बेलापूर सिडको कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करतील असा इशारा हजरत पुलशाह पीर दर्गा ट्रस्टचे मालक गफ्फुर शफुदीत काझी,हजरत ख्वाजा गरीब नवाज वेल्फेअर असोसिएशनचे महाराष्ट्र सचिव मोहम्मद युसूफ उमर अन्सारी व रिपब्लिकन सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष पवार यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.१८८५ पासून पनवेलच्या पारगाव येथे गफ्फुर काझी यांच्या मालकी हक्काच्या जागेवर हजरत पुलशाह पीर दर्गा आहे.सद्या या परिसरात विमानतळ होत आहे. सिडको व पोलीस प्रशासनाने ऐन निवडणूक काळात आचारसंहिता लागू असताना या दर्ग्यावर बुलडोझर फिरवून तो उध्वस्त केला आहे.सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.२९ नोव्हेंबर रोजी या प्रकरणावर सुनावणी आहे.तपूर्वी २१ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ च्या सुमारास या दर्ग्यावर बुलडोझर फिरवून तो पाडण्यात आला. हा प्रकार निवडणुकीनंतर तात्काळ करण्यात आल्यामुळे शासन आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ही कारवाई केवळ धार्मिक भावना दुखावण्यासाठी करण्यात आली आहे. असा आरोप ट्रस्टचे मालक गफ्फुर काझी यांनी केला आहे.दर्गा १८८५ पासून अधिकृत कागदपत्रांवर नोंदणीकृत आहे. तरीही प्रशासनाने हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कारवाई केली.या घटनेचा आम्ही निषेध करत असून दर्ग्याची पुनर्बांधणी न झाल्यास मुस्लिम समाजासोबत दलित समाजही या रस्त्यावर उतरून आंदोलनात सामील होणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शन करू असा इशारा गफ्फुर काझी व रिपब्लिकन सेनेने दिला आहे.

हजरत पुलशाह पीर दर्ग्यावरील कारवाईचा मुस्लिम समाज बांधवांकडून निषेध
 मुंबई / प्रतिनिधी:
१८८५ पासून पनवेलच्या पारगाव येथे  अस्तित्वात असलेल्या हजरत पुलशाह पीर दर्ग्यावर सिडको प्रशासनाने बुलडोझर फिरवून तो उध्वस्त केला आहे. त्यामुळे मुस्लिम व दलित समाजामध्ये कमालीचा रोष पसरला आहे.९ डिसेंबर पर्यंत दर्ग्याची पुनर्निर्मिती न केल्यास मुस्लिम समाज व रिपब्लिकन सेनेने कार्यकर्ते १० डिसेंबर पासून बेलापूर सिडको कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करतील असा इशारा हजरत पुलशाह पीर दर्गा ट्रस्टचे मालक 
गफ्फुर शफुदीत काझी,हजरत ख्वाजा गरीब नवाज वेल्फेअर असोसिएशनचे महाराष्ट्र सचिव मोहम्मद युसूफ उमर अन्सारी व रिपब्लिकन सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष पवार यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

१८८५ पासून पनवेलच्या पारगाव येथे  गफ्फुर  काझी यांच्या मालकी हक्काच्या जागेवर हजरत पुलशाह पीर दर्गा आहे.सद्या या परिसरात विमानतळ होत आहे. सिडको व पोलीस प्रशासनाने ऐन निवडणूक काळात आचारसंहिता लागू असताना या दर्ग्यावर बुलडोझर फिरवून तो उध्वस्त केला आहे.सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.२९ नोव्हेंबर रोजी या प्रकरणावर सुनावणी आहे.तपूर्वी २१ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ च्या सुमारास या दर्ग्यावर बुलडोझर फिरवून तो पाडण्यात आला. हा प्रकार निवडणुकीनंतर तात्काळ करण्यात आल्यामुळे शासन आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.  ही कारवाई केवळ धार्मिक भावना दुखावण्यासाठी करण्यात आली आहे. असा आरोप ट्रस्टचे मालक गफ्फुर काझी यांनी  केला आहे.
दर्गा १८८५ पासून अधिकृत कागदपत्रांवर नोंदणीकृत आहे. तरीही प्रशासनाने हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कारवाई केली.या घटनेचा आम्ही निषेध करत असून दर्ग्याची पुनर्बांधणी न झाल्यास मुस्लिम समाजासोबत दलित समाजही या रस्त्यावर उतरून आंदोलनात सामील होणार आहे.  मागण्या मान्य न झाल्यास मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शन करू असा इशारा गफ्फुर काझी व रिपब्लिकन सेनेने दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

Transport News

मुंबईच्या कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरूच

Mr. Vasudev Gaiyonde press कॉन्फरन्स