"बेस्ट उपक्रमातील दिंडोशी आगारातील झुंजार लढाया बेस्ट कामगार नेता श्री दिनेशसिंह यांचे दुख:द निधन"...
दिंडोशी बस आगार बेस्ट कामगारांवर शोककळा...
मुंबई- प्रतिनिधी नायगाव २६ नोव्हेंबर २०२४ रोजी बेस्ट उपक्रमातील स्वेच्छानिवृत्ती घेतलेले माजी बेस्ट वर्कर्स युनियनचे कार्याध्यक्ष व सध्याचे बेस्ट कामगार सेना उपाध्यक्ष झुंजारु लढाया कामगार नेते श्री दिनेशसिंह यांचे अल्पशा आजारानी कस्तुरी रुग्णालय भाईंदर येथे संध्याकाळी सहा वाजता वयाच्या ५४ व्या वर्षी दुख:द निधन झाले, या बेस्ट कामगार नेत्याच्या निधनाच्या बातमीनी बेस्ट कामगार वर्गात हळहळ पसरून दिंडोशी बस आगारावर शोककळा पसरली,
प्रत्येक कामगार बोलत होते की, बेस्ट कामगाराचा वाली गेला! दिवंगत जेष्ठ कामगार नेते शरद राव,शशांक राव यांचे ते कट्टर समर्थक होते ते मान्यताप्राप्त बेस्ट वर्कर्स युनियनचे कार्याध्यक्ष व बेस्ट पत संस्थेचे ते संचालक व विविध पदांवर राहून अनेक वर्षे बेस्ट उपक्रमातील बेस्ट कामगाराना मदत व सेवा केली ते सेवाभावी वृतीचे होते,बेस्ट कामगार नेते अॅड उदय आंबोणकर, प्रकाश वाळके, प्रकाश भट,रंगनाथ सातवसे आदि बरोबर बेस्ट वर्कर्स युनियन मध्ये बराच काळ कार्यरत होते,हल्ली ते बेस्ट कामगार सेना अध्यक्ष श्री सुहास सामंत व कार्याध्यक्ष अॅड उदय आंबोणकर यांच्या समवेत शिवसेना कामगार युनियनचे जेष्ठ उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते,
त्याच्या पश्चात एक विवाहित मुलगा रवी व पत्नी तारा सिंह, मोठे भाऊ अरुध प्रतासिंहअसून ते सध्या -डी वींग ४०५,प्रशांत नगरी बिल्डिंग नंबर एक जवळ
सेवन स्कॅऊरे स्कूल,नायगाव पुर्व येथे राहत होते त्यांच्या घरा जवळील देवकी पॅलेस वसई विरार मनपा कार्यालयाच्या शेजारी टॅन्क स्मशानभूमीत आज दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
ते मुळचे उत्तर प्रदेश अमेठी,गोरगंज येथे दशक्रिया विधी नऊ डिसेंबरला संपन्न होणार असून अंत्ययात्रेत जेष्ठ काँग्रेस आय नेते,शिवधर शुक्ला, बेस्ट वर्कर्स युनियनचे माजी कार्याध्यक्ष बेस्ट कामगार नेते सो.ना.कांबळे,राजु मुळे,सुदाम सानप,अविनाश हरियान,कनया सिंह,परमेकर,पारकर आदी बेस्ट उपक्रमातील बेस्ट कामगार मोठ्या संख्येत उपस्थितीत बरोबर दिनेशसिंह यांचे नातेवाईक पंकज राय,लक्ष्मी नारायणसिंह, आदि मातब्बर, शिवसेना कामगार युनियन, बेस्ट वर्कर्स युनियन,काँग्रेस पक्ष, विविध संघटना विविध पक्षाचे व बेस्ट उपक्रमातील बेस्ट कामगार मोठ्या संख्येने उपस्थित राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून निरोप दिल्याचे बेस्ट उपक्रमातील कामगार वर्गाची मोठी हानी व नुकसान दिनेशसिंह यांच्या निधनानी झाल्याची शोकभावना
बेस्ट कामगार नेते समाजभूषण सो.ना.कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
Comments
Post a Comment