abdul sattar news



अब्दुल सत्तार यांच्या तक्रार प्रकरणात मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांनी 24 तासात अहवाल सादर करण्याचे दिले पत्र

मुंबई : प्रतिनिधी                                                  शिंदे सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांनी सिल्लोड सोयगाव विधानसभा 104 निवडणूक लढविण्यासाठी नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेल्या शपथपत्रावर सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरपेल्ली यांनी तब्बल 17 मुद्याआधारे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारी अनुसार सदर शपथपत्रांमध्ये खोटी, भ्रामक व दिशाभूल करणारी माहिती नमूद केलेली आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांचा अर्ज फेटाळण्यात यावा व त्यांना अपात्र/ बाद करण्यात यावे. सदर तक्रारीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक पूर्वीच अब्दुल सत्तार यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. 
आता सदर प्रकरणी महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सह संबंधित अधिकाऱ्यांना प्रकरणात "भारत निवडणूक आयोगाने दिलेले निर्देश विचारात घेऊन नियमोचित कारवाई तातडीने करण्यात यावी व केलेल्या कारवाईचा अहवाल 24 तासात कार्यालयास सादर करावा." असे ईमेल द्वारे पत्र दिले आहे. सदर प्रकरणात आता जिल्हाधिकारी काय निर्णय घेणार आहेत! तसेच वरिष्ठांना काय अहवाल पाठवणार आहेत! याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
सदर प्रकरणामुळे अब्दुल सत्तार प्रचंड अडचणीत आले असून यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार लटकली आहे. 
सामाजिक कार्यकर्ता शंकरपेल्ली यांनी सांगितले की, लवकरच सदर प्रकरणी सिल्लोड दिवाणी तथा फौजदारी न्यायालयात लोकप्रतिनिधी अधिनियम 1950 मधील तरतुदी अनुसार फौजदारी खटला दाखल करण्यात येईल. त्याचप्रमाणे सदर प्रकरणी अधिकाऱ्यांनी 4 तारखेपर्यंत अंतिम निर्णय न घेतल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल. सदर प्रकरणी अब्दुल सत्तार अपात्र होतील असा त्यांना पूर्ण विश्वास आहे.

Comments

Popular posts from this blog

Transport News

मुंबईच्या कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरूच

Mr. Vasudev Gaiyonde press कॉन्फरन्स